RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

Sorted ?


"एकदा नं डोकं आवरायला काढलं पाहिजे. नुसताच पसारा झालाय. सगळा वैचारीक गोंधळ."
"ते शक्य नाही... त्यासाठी आधी तुला पसाऱ्याच्या definition पासून सुरुवात करायला लागेल."
"???"
"एखादी वस्तू त्याच्या जागेवर नसणं म्हणजे पसारा... बरोबर?"
"हो... तेच तर झालंय... सगळे कसे अस्ताव्यस्त... विखुरलेले विचार."
"पण त्यांच्या अशा ठरलेल्या जागा असतातच कुठे?"
"हं... कमीत कमी नासके, कुजके, खराब काढून तरी टाकता येतील."
"असं वाटतं तुला? खरं सांगतो, विचारांचं मांजरासारखं असतं. घरात नको म्हणून कितीही दूर सोडून आलं तरी आपण घरी पोहोचायच्या आत ते आपल्या घरात."
"मग काही सुजलेले, bloated... अवास्तव महत्व मिळाल्याने गर्विष्ठ झालेले... त्यांची तरी हवा काढून घेते."
"ती जागा दुसरे भरून काढतील. म्हणजे विचारांची पिलावळ आणखीनच वाढणार."
"कमीत कमी sorting तरी?"
"ते कसं? त्यासाठी तुला प्रत्येकावर एक आणि फक्त एकच लेबल लावायला लागेल आणि त्यांना एका जागी ठेवायला लागेल. एकच लेबल लावणं अवघड आहे पण एक वेळ जमेल. एका जागी ठेवणं? सगळेच विचार भरकटणारे..."

माझा बौद्धिक गुंता आणखीनच वाढवून तो निघून गेला.Related posts:   Sorted(2),  Sorted (3)

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

11 comments:

Anonymous said...

ek sadha prashna majha lakh yeti uttare
he khare ki te khare ki te khare

सौरभ said...

अरेच्च्या... तुम्हीपण डोक्याची सर्विसींग करायला घेतली. :) चांगलय चांगलय :D नीट आवरा... नाहितर आम्ही आहोतच "ब्रेनवॉश" करुन द्यायला. :D

अनघा said...

अलका, सर्वात कठीण काम काढलंयस बुवा तू! माझ्या तुला शुभेच्छा! तू मला 'same to you' म्हणू शकतेस! :)
आणि सौरभ, डोक्याची सर्विसिंग?! आवडलं मला! :)

Anonymous said...

पिच्छा न सोडणा-या मांजराचं उदाहरण फार आवडलं.
संदीप खरे आठवला.
"सुटका नाही... दिवस-रात्र घरात-दारात भेटेन-भेटेन... विचार म्हणतो चेपेन-चेपेन."
सुंदर !!!

अलका said...

@saurabh: :)))) brainwash... मस्त !!!

Maya said...

hope someone will come up thought-busters.

अलका said...

@अनघा: All the very best to you... माझे मात्र गेले दोन दिवस बौद्धिक दिवाळखोरीत गेले आहेत. Well, tomorrow is another day !!!

Pralhad said...

कुठपर्यंत आलं काम? उतू नको मातू नको घेतला वसा टकू नको.

Vibhas said...

" गोली मारो भेजे मे, भेजा शोर करता है "

श्यामली said...

hi,
baryach usheeraa olkha jhaalee aapalee as watatay...haa pasaaraa wachalyaavar. :)

aso der aae durust aae :) likhate raho.....!

भानस said...

काळ कितीही पुढे सरला तरीही काही विचार( खरं तर कुठलेच ) पिच्छा सोडतच नाहीत. प्रगती कुठवर आलीये गं? :)

Post a Comment