RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

Favorites


जिंदगीभर एकही गलती कर रहा था मैं गालिब ।
धूल चेहरे पे थी.. और आइना साफ कर रहा था मैं ।




कभी आंसू कभी खुशी बेची
हम गरिबों ने बेकसी बेची

चंद सांसें खरीदने के लिये
रोज़ थोड़ी सी जिंदगी बेची

जब रुलाने लगे मुझे साये
मैंने उक्ता के रोशनी बेची

एक हम थे के बिक गये खद ही
वरना दुनिया ने दोस्ती बेची

- अबु तालीब



I Have A Dream

- by Abba


I have a dream, a song to sing
To help me cope with anything
If you see the wonder of a fairy tale
You can take the future even if you fail
I believe in angels
Something good in everything I see
I believe in angels
When I know the time is right for me
I'll cross the stream, I have a dream

I have a dream, a fantasy
To help me through reality
And my destination makes it worth the while
Pushing through the darkness still another mile
I believe in angels
Something good in everything I see
I believe in angels
When I know the time is right for me
I'll cross the stream, I have a dream
I'll cross the stream, I have a dream

I have a dream, a song to sing
To help me cope with anything
If you see the wonder of a fairy tale
You can take the future even if you fail
I believe in angels
Something good in everything I see
I believe in angels
When I know the time is right for me
I'll cross the stream, I have a dream
I'll cross the stream, I have a dream





Where the mind is without fear

- Ravindranath Tagore


Where the mind is without fear and the head is held high
Where knowledge is free
Where the world has not been broken up into fragments
By narrow domestic walls
Where words come out from the depth of truth
Where tireless striving stretches its arms towards perfection
Where the clear stream of reason has not lost its way
Into the dreary desert sand of dead habit
Where the mind is led forward by thee
Into ever-widening thought and action
Into that heaven of freedom, my Father, let my country awake.



जीना

- वसंत बापट


कळले आता घराघरांतुन
नागमोडीचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेवुनी
हळूच जवळी ओढायाला

जिना असावा अरुंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातील अधीर धडपड

मूक असाव्या सर्व पायऱ्या
कठडाही सोशीक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा

वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहुनी
चुकचुकणारी पाल असावी

जिना असावा असाच अंधा
कधि न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधि न करावी चहाडखोरी

मी तर म्हणतों- स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पृथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे




काही माणसं मैत्रीनं खांद्यावर हात टाकतात
नि आपल्या बेसावध क्षणी आपल्याला
स्वत:चा खांदा देऊन टाकतात !

काही माणसं वरनं हापूसच्या आंब्यासारखी दिसतात
चवीनं त्यांचा स्वाद घ्यावा तर
नेमकी बाठीला लागलेली असतात !

काही माणसं वरनं सुकलेल्या चिखलासारखी असतात
जमीन कडक म्हणून पाय ठेवावा तर
आपल्याला आणखीनच आत खेचतात !

काही माणसं पिंपळाच्या पानासारखी असतात
त्यांची जाळी झाली तरी
मनाच्या पुस्तकात जपाविशी वाटतात; आयुष्याभर !



लावण्यरेखा

- बा. भ. बोरकर


देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
गोरटे वा सांवळे या मोल नाही फारसे

तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा
ओळती दु:खे जगाची सांडिती चंद्रप्रभा

देखणे ते ओठ ते कीं ओविलीं मुक्ताफळे
आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होतें कोंवळें

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे

देखणी ती पाउलें जीं ध्यासपंथी चालती
वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्में रेखिती

देखणे ते स्कंध ज्यां ये सूळ नेतां स्वेच्छया
लाभला आदेश प्राणीं निश्चयें पाळावया

देखणीं तीं जीवनें जीं तृप्तिची तीर्थोदकें
चांदणे ज्यांतून फांके शुभ्र पाऱ्यासारखे

देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्निचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा



Stopping by Woods on a Snowy Evening

- Robert Frost


Whose woods these are I think I know.
His house is in the village though;
He will not see me stopping here
To watch his woods fill up with snow.

My little horse must think it queer
To stop without a farmhouse near
Between the woods and frozen lake
The darkest evening of the year.

He gives his harness bells a shake
To ask if there is some mistake.
The only other sound’s the sweep
Of easy wind and downy flake.

The woods are lovely, dark and deep.
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.




झाड म्हणतं धारा दे
वासरू म्हणतं चारा दे

सृष्टीमधल्या चराचराला देवा,
सौख्य निवारा दे.

नदी ओहळा पाणी दे
वन-वेळुंना गाणी दे
अखंड वादळ नको ईश्वरा,
झुळझुळणारा वारा दे.

तृणकोंबांना प्रकाश दे
नवांकुरांना विकास दे
दुष्काळाची नको गर्जना,
सृजना सर्व शिवारा दे.

उन्मेषाला सुस्वर दे
सत्यशिवासह सुंदर दे
विकासगतीला प्रत्येकाच्या
सदैव फिरता फेरा दे.

मांगल्याचे गाणे दे
सौभाग्याची वाणी दे
चिरंतनाच्या विश्रांतीला,
तुझ्या पदाशी थारा दे.

- रवींद्र भट




अती कोपतां कार्य जातें लयाला
अती नम्रता पात्र होते भयाला
अती काम तें कोणतेंही नसावें
प्रमाणामध्ये सर्व काही असावें

अती भूषणें मार्ग तो संकटाचा
अती थाट तो वेष होतों नटाचा
रहावें असें कीं न कोणी हंसावें
प्रमाणामध्ये सर्व काही असावें

स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती
अती लोकनिंदा करी दुष्ट चित्तीं
न कोणा उगें शब्द-स्पर्षे डसावें
प्रमाणामध्ये सर्व काही असावें

जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी
नव्याचे अती लाडके शुद्ध नादी
खरें सार शोधोनियां नित्य घ्यावें
माणामध्ये सर्व काही असावें

- कृष्णाजी नारायण आठल्ये






  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

5 comments:

Anonymous said...

hahahahahahahahaha !! जीना.. क्या बात है. हे आमचं पण secret होतं. जीन्याचे विविध उपयोग !!

Anonymous said...

काही माणसं !! खूपच छान. पटलं.

जान्हवी said...

देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्निचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा
:-)

Anonymous said...

+ A Dream To Cherish And Miles~N~Miles~N~Miles To Go ! Aakaashi Jhep Ghere Paakharaa....Sonyaachaa Pinjaraa....Are Punhaa Aayushyaachyaa Petavaa Mashaali....Sakhi~Shejaarini,Too Hasat Rahaa....+ ~~Chhakuli.

Arun Phadke said...

sarvach goshti apratim !!
aasech navin navin aamhala aaikala v vachnyasathi milat
raho ho namra vinanti . dhanyvad !! .

Post a Comment