जंगली महाराज रोड, पुणे. ’बालगंधर्व’ समोर एक पंडाल. त्याच्या बरोबर मागे pizza hut. ह्या pizza hut ला एरव्ही प्रचंड गर्दी असते.
सद्ध्याचं गर्दीचं कारण मात्र संपूर्णत: वेगळं. म्हणजे वेयोगट तोच. कॉलेज मधली सळसळती तरुणाई. आज सगळ्यांनी ’India against corruption' चे t-shirts घातलेले. मुलं-मुली सगळ्यांच्याच डोक्यावर ’I am Anna' च्या टोप्या. गालांवर क्रिकेटच्या मॅचच्या वेळेस दिसतात तसे झेंडे रंगवलेले. ’वंदे मातरम्’, ’भारत माता की जय’, ’मैं भी अण्णा, तू भी अण्णा, अब तो सारा देश है अण्णा’ च्या घोषणा. जवळच post cards ठेवलेली. त्यावर पंतप्रधानांचा पत्ता छापलेला. तुम्ही तुमचा msg अणि हवे असेल तर नाव त्यावर लिहा. जवळची काही मुलं ती पोस्टात टाकणार.
मंचावर बरीच मंडळी उपोषणास बसलेली. तेथून एकजण ध्वनीक्षेपकावरून सांगत होता- "येथून बोलणारा अथवा घोषणा देणारा कोणीही, कुठल्याही राककीय पक्षाचे, पदाधिकाऱ्यांचे किंवा नेत्याचे नाव घेऊ शकत नाही."
तेवढ्यात अर्ध्या तासापूर्वी बाजीराव रोडला भेटलेली, झेंडे घेऊन घोषणा देत फिरणारी दोन टोळकी तिथे आली. सगळ्यांनी मिळून जाम नारेबाजी केली. मग ती टोळकी पुढच्या दिशेने निघून गेली.
तासभर तिथे थांबले. पूर्वी हे सगळं केलेलं. पण मध्यंतरीच्या काळात सगळ्या पिढीचा झालेला तसा एक- disconnect.
माझा लोकपाल विधेयकावर किंवा अण्णांवर फारसा अभ्यास नाही, ही सुरु होऊ घातलेली चळवळ कुठपर्यंत जाईल- किती परिणामकारक होईल? उपोषण करणे आणि भुकेलेल्यांना जेवायला घालणे यात अधिक योग्य काय? या वादातही मला जायचे नाही.
पण ’अलिकडची पिढी’ असं म्हणताना जिथे ’वाया गेलेली’ असा एक छुपा अर्थ असतो, तीच मुलं जेव्हा colleges बुडवून एका योग्य कारणासाठी, सांसदीय मार्गाने react होत असताना, ती योग्य मार्गावर आहेत हा त्यांना विश्वास वाटावा म्हणूनही असेल कदाचीत, उद्या उपोषण करणाऱ्यांच्या यादीत माझं नाव देऊन आले.