नवर्याचा सगळा दिवस checklists, check boxes आणि reminders यांवर चालत असतो. आणि नेमक्या याच कारणामुळे तो आता एका परिस्थितीत सापडला आहे.
त्याचं झालंय असं......
मी नं माझ्या नवर्याची peripheral memory आहे. म्हणजे external hard disk म्हणा नं...
या व्यवस्थेने एक साध्य होतं की त्याला 'office' या विषयाच्या परिघाबाहेर मुद्दामहून फार कमी लक्षात ठेवावं लागतं.
जसं काही- येऊ घातलेले सणवार, लग्नं-मुंजी-वाढदिवस, येणारे पाहुणे, असलं काहीही.... फक्त गरज असेल तेव्हा मला विचारावं.
नेहमीच्या नसलेल्या कोणाकडेही जाताना, त्यांना असलेली मुलं-बाळं, त्यांच्या घरी जाण्याचा रस्ता या सर्व गोष्टींवर मी त्याला गाडीत बसल्याबसल्या अद्ययावत करत असते.
असली माहिती फार काळ retain करण्याची गरज नाही असं त्याला वाटतं. तीचा वापर झाला की तितक्याच तत्परतेने विसरून जावी.
( हे सगळं कसं त्या शेरलॉक होम्स् सारखं आहे. तो नाही का त्या डॉ. वॉटसनला म्हणतो, "Now that I know the Earth revolves around the Sun, I will make an every effort to forget it." कारण त्याच्या Science of deduction मध्ये या माहितीचा काहीच उपयोग नव्हता. )
त्यामुळे एक तर मी, नाही तर त्याच्या त्या checklists, यांवरच त्याला अवलंबून रहावं लागतं.
या याद्या बनवणं हा सुद्धा एक मजेशीर प्रकार असतो.
उदाहरणार्थ, वाणसामानाची यादी. या यादीतील प्रत्येक पदार्थाचं रंग-रूप वर्णन करून सांगावं लागतं.
जसं काही,
'१ किलो पोहे आणायचे आहेत. पण पोहे दोन प्रकारचे असतात. जाड आणि पातळ. मला जाड हवे आहेत. समोर आहेत ते नेमके जाड आहेत की पातळ हे तुला कळणार नाही. तिथे काम करणार्या माणसाला त्यांच्याकडे असलेले सर्व प्रकारचे पोहे दाखवायला सांग. त्यातले जे तुला relatively जाड वाटतील ते आण.’
किंवा ’कोबीच्या गड्ड्याचा diameter ५ इंचांपेक्षा जास्त नको.’
या सगळ्यात दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेला प्रकार काही बसत नव्हता.
मी पुण्यात असतानाची गोष्ट आहे. त्याने दुबईहून फोन केला आणि सांगितलं, "I love you."
इतकी उत्स्फूर्तता, असं व्यक्त होणं, त्याच्या स्वभावाचा भाग नसल्याने भांबावून मी पण म्हंटलं, "बरं मग? त्याचं आत्ता काय? झाली की लग्नाला कितीतरी वर्ष."
तरी त्याचं आपलं तेच.. "Today I have to tell you, I love you."
काही दिवसांनी परत तसाच फोन.. मग परत पुन्हा.... (मी मनात... फार प्रवास झाला वाटतं आपला एवढ्यात.. ... तब्येत बरी आहे ना याची... / .... वगैरे.)
दुबईत परत आले तरी तेच. पण यावेळेस वाक्य थोडं बदललं होतं. Today is Tuesday and I love you....
आता हा मंगळवार कुठून आला ?
शेवटी समोर बसवलं आणि हा काय प्रकार समजावून सांगायला लावला.
म्हणतो कसा, "नाही. नाही. मंगळवार तसा incidental आहे. माझ्या असं लक्षात आलंय की मी तुला असं काही फारसं म्हणत नाही. But I should be saying such a thing to you regularly. म्हणून मी सरळ दर मंगळवारचं एक reminder फोनवर टाकलंय. To tell you- I love you."
माझा अर्थातच- dropped jaw.
मग मी पण काट्यानेच काटा काढायचा ठरवला. त्याचा फोन घेतला. ते reminder delete केलं.
आणि एक नवीन Location based reminder तयार करून टाकलं.
Repeat - Forever
Location - Our home
Reminder text- 'Google- Remind me to be nice to Alka when I am at home.'
आता या माणासाने बाहेरून येऊन कधीही घरात पाऊल टाकलं रे टाकलं की त्याचा फोन ’टण्ण’ वाजतो आणि नवर्याला एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची आठवण करून देतो.
माझ्या चेहर्यावर हलकिशी स्मितरेषा उमटते पण मनात आनंदाच्या उकळ्या फुटतात. 🤣😇
Love such idiosyncrasies in people. Life is beautiful !!