RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

रंग


रंग ..........
स्वप्नांचे पहावे ....   हास्याचे उधळावे ....
उत्कटतेचे झेलावे ....   होळीचे खेळावे ....
चुकीचे पुसावे ....   थोडे वेगळेही जपावे ....
कधी कागदावर उतरवावे ....
मनस्वितेत शोधावे ....   तेजस्वितेचे पूजावे ....
प्रेमरंगी भिजावे .........
आत्मरंगी रंगावे .........
आणि
नेत्रदानाने कुण्या एकाच्या जीवनी आणावे .... रंग !!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

छटा


डोक्यात जाते ती हवा .. शरिरात होतो तो वात ..
अंगावरून जाते ती झुळूक .. हळूवार घातलेली ती फुंकर ..
घेतलेला तो श्वास .. सोडलेला तो नि:श्वास ..
घोंघावते ते वादळ .. सोसाट्याचा तो वारा .. मंद मंद समीर ..
मनाचे ते उधाण .. विचारांचे ते थैमान ..
सभोवतीचे ते वातावरण ..
आणि प्राणांसाठी तो वायू ..

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS