RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

Choice (2)


निमाच्या घरामागे, थोड्या अंतरावर मोठ्ठं पटांगण आहे. तिथे नेहमी मांडव घालून लग्नं होत असतात.

भर दुपारचा मुहूर्त असलेल्या ह्या लग्नांना त्या टळटळीत वेळी सुद्धा तब्बल 10,000 watts चे 'Loud'-speakers लावलेले..

ह्या speakers वरून वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांवरून त्या लग्नातल्या पार्ट्यांच्या मानसीकतेचा अंदाज घेण्याचा जसा आम्हाला एक चाळा लागलेला..
कधी कधी ह्या गाण्यांचा choice खूपच धक्कादायक असतो.

म्हणजे लग्नाआधी वाजवलं जाणारं ’Oooh.. LaLaLa.. अब मैं जवाँ हो गयी’ किंवा ’अप्सरा आली’.. पचायला जरा जड गेलं, तरी समजू शकतं..

पण लग्न लागल्या नंतर लगेचच ’विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती ?’ ???


Related posts :   Choice

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS