RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

नावात काय?


आज सकाळी ६.३० ला कॉफी घेत टी. व्ही वरच्या बातम्या ऐकण्याची चूक केली. बातम्या, मग त्या वर्तमानपत्रातल्या किंवा टी. ही. वरच्या, दिवसाच्या पहिल्या काही प्रहरांमध्ये टाळलेल्याच ब-या असा माझा ठाम समज आहे.

ऐकलेली पहिलीच बातमी, "समाधान नावाच्या युवकाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला जाळून टाकले."
बातमी तर क्लेशकारक होतीच, पण तितकाच त्रासदायक वाटला तो व्यक्तीचं नाव व कृत्य यातील विरोधाभास. नाव 'समाधान' आणि कृत्य ? म्हणजे आपण म्हणतो की, 'नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा'. पण विसंगती इतकीच असेल तर ठीक. हे काही तरी भलतेच !

तसं आपलं नाव ठेवण्याचा अधिकार आपल्या पालकांना देऊनच माणूस जन्माला येतो. पण कधी कधी फार अर्थपूर्ण नाव शोधण्याच्या प्रयत्नात पालकांकडून बराच गोंधळ होतो. तशी काही नावंही risky असतात. रुद्रप्रताप, नाजुका, रेखीव, नम्रता ही नावे निदान पाळण्यात तरी ठेवू नयेत.

एक कल्पना... पाळण्यात नाव हे 'क्ष', 'अबक', 'xyz', 'pqr' असलंच काहीतरी ठेवावं. वयाच्या १८ वर्षांनंतर त्यांची जागा अर्थपूर्ण नावांनी घ्यावी.
जसं गणितातल्या समिकरणांमध्ये (५क्ष+ ३= १८) नाही का, ते सोडवत आपण ’क्ष’ ची किंमत शोधतो,

तसं वयाच्या १८ वर्षांनंतर, आपल्या जीवनाचं समिकरण सोडवत, आपणच आपल्या 'क्ष' ला अर्थपूर्ण करायचं !

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

7 comments:

Pralhad said...

:)) very interesting !!

pradnya aras said...

mast ch! great article..!!
ata navarang sathi de na kahitari chhan!

Anagha said...

पण आपण जेंव्हा जन्माला आलो तेंव्हाच आईबाबांनी आपण कसं असावं ह्याबद्दल 'त्यांची' जी काही कल्पना आहे त्यानुसार आपलं नाव ठेवलं तर बरं नाही का?
निदान आपल्याला कळायला लागल्यानंतर आपल्याला जाणीव होते कि आपल्याबद्दल आईबाबांची नक्की कल्पना तरी काय आहे!
म्हणजे मी सूर्यासारखं असावं, चंद्रासारखं असावं कि एकदम एखाद्या फुलासारखं असावं!!
:)

Darshana said...

Very thoughtful!

अलका said...

@अनघा: :) खरंय! इथे मला एक आठवलं.. आमच्या वर्गात college मध्ये एक मुलगा होता.. मजबूत, धिप्पाड. त्याचे नाव होते तुषार. त्याला fishpond मिळाला होता.. ’तुषार... नव्हे धबधबा !!’. (आता असले प्रकार college मध्ये असतात की नाही, देव जाणे)

Anonymous said...

गुलाबाच्या फुलाला जर नाव ठेवताना क्ष ठेवलं असतं तर त्याचा गुणधर्म बदलला असतं का? नाही ना.... त्यामुळे नावात काही नसतं करणाऱ्याच्या कृतीत असतं > बघअरयाच्या दृष्टीत असतं लिहिणाऱ्याच्या शब्दात > शब्दातल्या अर्थात असतं > अर्थातल्या भावनेत असतं > भावनेतून होणाऱ्या कृतीत असतं

Revati said...

Hey great idea...actually remember having read somewhere that the 'red indians' change their names as they grow older. As in palnyat 'doe eyed' and later in life ' fleet foot'. Ur kartutva changes ur identity ...had actually liked the idea then...

Post a Comment