RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

कोमेजली कवळी पानं


programming / coding चे चाललेले काही नवे प्रयोग... त्यासाठी करावी लागणारी internet वरची सखोल शोधाशोध... एकाग्रता...
अचानक गळून पडलेल्या झाडाच्या पानाच्या आवाजाने त्या वातावरणाला छेद दिला.

घरात पंचवीस एक ’हिरवी’ चिल्ली-पिल्ली वाढत आहेत. ह्या thermostat controlled 22oc वातावरणात ही कोणी नाराजी दाखवली?
सात-साडे सात फूट ताडमाड वाढलेल्या एका झाडाचे, काहीसे नवीनच, पान खाली पडले होते. मातीची आर्द्रता, बाहेरचे तापमान अशी जुजबी पाहणी केली आणि असं होतं कधीकधी, मनात म्हणत माघारी वळले.

पण गेल्या तीन दिवसात अशी पाच पानं? माझ्या अस्वस्थतेचा कडेलोट.. त्या झाडाचे जवळ-जवळ प्रत्येक पान मागून-पुढून तपासून पाहिलं. काही अनोळखी खुणा... काही वेगळी स्पंदनं... यांचा शोध घेतला. चक्क एक छानसं भिंग घेऊन सुद्धा.

हे सर्व चालू असताना एक वेगळाच विचार मनात आला..
असे गळून पडलेल्या भावनांचे आवाज पण ऐकू आले असते तर? आणि ते ऐकू येण्यासाठी शांतता हवी की संवेदनशीलता?


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

11 comments:

Anonymous said...

:( halakech jag maj aali dukhachya mand swarane.

अनघा said...

सुंदर गं.
नाजूक...हळवं

Anonymous said...

आल्हाद: एखाद्या अवघड समेवर यावी तशी अचानक शेवटी land झाली आहेस. तुझी संवेदनशीलता नक्कीच समोर आली आहे हे मात्र नक्की.

Anonymous said...


Khupach chhan Alkaji...keep writing...

Anonymous said...

kiti jari ghatale pani, keli nigrani, keli-che sukale pran :(

Anonymous said...

oooooops :(

Anonymous said...

hehe. कोसळत्या भावनांचे आवाज ’पतझड’ इतके हलके किंवा ओंडका पडल्या इतके मजबूत असले तरी ते ऐकू यायला ऐकणाऱ्याचे कान शाबूत हवेत.

Abhijeet said...

Kya baat hai!! Silence or sensitiveness that is the question!! Awadesh!!

Anonymous said...

Radhika: इतक्या भावनांचा सतत चुराडा होत असतो की नुसता कल्लोळ माजेल :(

madhuri said...

संवेदनशीलता असली कि आवाज नक्की ऐकू येईलच ना!

durit said...

हळवं म्हटलंच तर पराकोटीचंच...
नुक्ता हा माझ्या चिल्या-पिल्या ब्लॉगवर गिरवलाय..
.

Post a Comment