RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

Housewife


मध्यंतरी एका कार्यक्रमासाठी बोलावले होते. विषय होता- ’वेगळ्या वाटेने चालताना’.
’आठवणीतली गाणी’ या संकेतस्थळाच्या १० वर्षांच्या प्रवासावर बोलायचे.
खूप उत्सुक श्रोते असल्याने संकल्पना सुचणे, विस्तार, घडत गेलेले बदल, असे अनेक मुद्दे येत गेले.

सर्वसाधारणे अशी समजूत असते की back-end ला एखादा ग्रूप किंवा कमीत कमी एक ’पुरुष’ असेल.
इथे मी एकटी स्त्री असल्याने तर अधीकच कुतूहल.

स्वाभाविकच माझे पूर्वी वेगवेगळ्या महाविद्यालयांमधे गणित, संख्याशास्त्र या विषयांचे प्राध्यापक असणे....  नंतर पुण्यात असताना शिकवलेले Oracle 8i आणि त्यातच कुठेतरी असलेले ’आठवणीतली गाणी’च्या संरचनेचे मूळ....  असे बरेच काही येत गेले.

संकेतस्थळाचा सगळा डौलारा सांभाळताना, सतत बदलत्या internet technology शी कसे जुळवावे लागते अशा तांत्रिक गोष्टींपासून ते संकेतस्थळाचा जो विषय....  गाणी निवडणे....  ती मिळवणे....  त्यांची इतर माहिती गोळा करणे....  करावा लागणारा वेगवेगळ्या स्तरांवरील जनसंपर्क....  त्यावर दुबईतील वास्तव्याचा परिणाम होतो का? तेथील जीवनशैलीमुळे काय आव्हाने येतात?.... वगैरे, वगैरे.

साधारणत: दीड तासांच्या या कार्यक्रमात औपचारिक मुलाखती बरोबर अनौपचारिक गप्पा असल्याने छान मजा आली. कार्यक्रम संपल्यावर एक गृहस्थ भेटायला आले.

"छान वाटलं सगळं ऐकून..  पण बाकी काय करता आपण?"
प्रश्नाचा रोख काहीच न समजल्याने माझे नुसतेच, "म्हणजे ?"
"नाही, म्हणजे काही job करता..   की Housewife ?"
!!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

12 comments:

Anonymous said...

hahaha :)
धडॅम.. crash landing :)

Alka Vibhas said...

yep. absolutely. :-))
Neema, aga kadhi tari svatahachya navane comment taak ki, Gange .. :))

इंद्रधनू said...

मानसिकता....... :)
पण तुमचं ’आठवणीतली गाणी’ संकेतस्थळ अप्रतिम आहे, त्याबद्दल खूप धन्यवाद.... बरीच गाणी मी तिथे ऐकते....

सौरभ said...

:D

Shubhangi Sawant said...

Majhya ek mitra aahe Rahul... tyane mla sangitley.. tu housewife nako mhanus swatahla.. Homemaker mhan..

Shubhangi Sawant said...

Majhya ek mitra aahe Rahul... tyane mla sangitley.. tu housewife nako mhanus swatahla.. Homemaker mhan..

अनघा said...

:D

गृहिणी ते रोहिणी... said...

खरं तर प्रश्नच चुकीच होता त्या गृदस्थांचा, उलटपक्षी तुम्ही कोणत्या झाडावर बसलेले आहात असा प्रश्न विचारला असतात की त्यांना काय चुकले ते कळले असते...

आणि, रोहिणी ते गृहिणी... said...

निवांत अशा व्यक्तिमत्यांशी गप्पा (म्हणजे त्याच्या "मनाच्या" शर्टात शिरलेल्या उवा) मारून झाल्या की त्यांच्या मनातून हळूच रोहीणी ते आरोहिणी गायन प्रकाराने आपल्या मूळ अवरोहिणी पदावर यायचे असते...

ह्यालाच सॉफ्टवेअर क्षेत्रात डिबगिंग असे संबोधतात...

भानस said...

हा हा... इथे दिसून येते मानसिकता.

बाकी कुठलेही गाणे अडले की मला हटकून तुझीच आठवण येते. :)

Vidya Bhutkar said...

:) Jar itake sarv karunahi lok ase prashn vicharat asatil tar tyanchya drushtine ayushya keval 'job' itakech aahe mhanave lagel. Feel sorry for their mentality.
Vidya.

Abhishek said...

’आठवणीतली गाणी’ आमच आवडतं संकेतस्थळ. ती मुलाखत रेकोर्ड करून ठेवली आहे का कुठे... आम्हा पामरांना पण एका आन्त्रेप्रेनुअरला ऐकायला आवडेल...
बाकी समाजात असे बरेच गृहस्थ असावेत, आणि कदाचित तुमचा कार्यक्रम पुण्यात झाल्यामुळे प्रतिक्रिया प्रत्यक्ष उमटली असेल. अशा लोकांच्या प्रश्नांच उत्तर देणे हे इंटरनेट समोरील अजूनतरी आव्हान आहे, कारण त्यात फायदा आणि उत्पन्न असू शकत हे लोकांना माहित नाही. आणि कदाचित मुलाखतीत ह्या मुद्द्यावर उल्लेख झाला नसेल.
माझ मानण आहे की पुणेकर बोलतात म्हणून दिसतात, प्रश्न सगळ्यांनाच असतात.
बाकी Anonymous उर्फ नीमा उर्फ गंगू (ह.घे.) म्हणतात तसा crash landing चा अनुभव आहे :)

Post a Comment