RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

निरागस


तो त्याच्या वडिलांच्या खांद्यावर होता. डुगडुगणारी मान, गोल गोल डोळे, डोक्यावर तुळतुळीत टक्कल. जवळ जवळ सहा फूट वडिलांच्या खांद्यावर हा जेमतेम सव्वा फूट. वय असेल ५-६ महिने. टुकुर टुकुर डोळ्यांनी सगळीकडे पहाणं चाललं होतं. नजरेत सगळ्या जगाबद्दलची उत्सुकता ठासून भरलेली. माझी प्रत्येक हालचाल निरखून पहात होता.

त्याचं निरिक्षण करण्याच्या नादात २ coke चे cans उचलले आणि shopping trolly मध्ये टाकताना बाजूच्या २ cans ना धक्का लागला. ते खाली पडले. धप्प धप्प असा आवाज झाला. त्याला दचकायला पुरेसा. त्याच्या नजरेत धरणीकंप झाल्याचे भाव. त्याने माझ्याकडे पाहिलं. मला हसूच आलं. त्याने अर्धा क्षण डोळे बारीक केले, कपाळाला आठ्या घातल्या. मग तोंडाचं बोळकं पसरवीत मनापासून, दिलखुलास हसला. हसताना मानेचा तोल गेला. नाक वडिलांच्या खांद्यावर आपटलं, जीवणी भोवतीचा सगळा ओलावा वडिलांच्या शर्टाला पुसला गेला. ह्यावेळेस त्याचं त्यालाच हसू आलं- स्वत:च्या फजितीचं. मग बराच वेळ मान तिरपी करून मला मिश्किल हास्य देत राहिला.

माझ्यासाठीही जग खूप सुंदर झालं. उरलेला संपूर्ण दिवस मोरपीसा सारखा तरंगत, हलका गेला.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

14 comments:

Saurabh said...

:) feel very nice to see this post after previous one... :)

अनघा said...

खूप छान. हसू देऊन गेलं.

श्रीराज said...

...आणि तुमचा हा लेख वाचून माझे ही पुढचे काही दिवस छान जाणार आहेत :)

AmolAkolkar said...

Ha aplyatla tar koni nahi :)... Chanch blog!!

अलका said...

@Amol: नाही रे.. असाच super market मधला. म्हणून तर जास्त छान वाटलं.

Pralhad said...

मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का ?
त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?

Darshana said...

So cute!!your observation is tremendous. Could actually visualise the innocence...happy change in mood.

NITIN said...

Refreshing !

Sadhana said...

Good Observation! Pan te itkya sunder shabdat guntavana tulach jamata.

श्रद्धा said...

'अफाट गोड' लिहिलं आहे. माझा दिवस काय पुढचा सगला आठवडा 'हसरा' जाणार! :)
cant believe I was just crying a minute before on your previous post. :P

Manishkhapre said...

अतिशय सुंदर ..!!
सुपर मार्केट मधलं हे दृश्य संपूर्णपणे डोळ्यासमोर सहज उभं राहिलं.. खूप सुंदर !

Equitech Solutions said...

khaokharach dolyasamor ubha rahat...maza mulaga ata tya vayatalach ahe..tyamule tyala dolyasamor thevun vachatana anakhich majja aali.....

Equitech Solutions said...

khaokharach dolyasamor ubha rahat...maza mulaga ata tya vayatalach ahe..tyamule tyala dolyasamor thevun vachatana anakhich majja aali.....

श्री said...

शोनूलं गंS ! बायको बरोबर मोल मध्ये गेलो असतानांचा माझा नेहमीचा निखळ स्ट्रेस बस्टर!
अश्यानेच हे जे काही लिहितेस नं ते आपलं आपलं वाटतं , आपल्याशीच शेअर केल्यासारखं....

Post a Comment