RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

ती गेली तेव्हा ...


ती गेली तेव्हा ...
खरंच पाऊस रिमझिम निनादत होता. मंद, शांत, गंभीर. तीच्याच सारखा.
खरं तर तिच्या नसण्याची एव्हाना सवय व्हायला हरकत नव्हती.
दोन्ही हातांची बोटं दोनदा वापरावी लागतील ... इतकी वर्षे झालीत.
ती गेली तेव्हा ...
अजून बरंच काही घडलं.
बाबांच्या स्कूटरचं मागचं सीट रिकामं झालं.
अंगणातील ५ रंगांच्या जास्वंदी, मोगऱ्याचा ताटवा, ३ आंब्याची आणि २ नारळाची झाडं कावरी-बावरी झाली.
शेजारच्या रमाचं कैरीचं लोणचं शिकणं अर्धवट राहिलं.
माझ्या लेकाचे 'जावयाचे पोर' म्हणत होत असलेले लाड फार बालपणी संपले.
नवऱ्याच्या तोंडातली चकलीची चव गेली.
ती गेली तेव्हा,
शिल्लक राहिले खूप आवाज.
ते कधी कानात शब्द होऊन घुमतात.
कधी डोक्यातले विचार होतात.
कधी मनावरचे संस्कार,
तर कधी हृदयाची अस्वस्थ धडधड...

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

12 comments:

Saurabh said...

:(

Pralhad said...

hmmm ...

अनघा said...

कधीही न मालवणारं हे दुखः ...
काळ ह्या दुखःला नाही औषध देत.

अलका said...

@अनघा: खरंय ग !

श्रीराज said...

तुमचा लेख वाचल्यानंतर, अनघाची प्रतिक्रिया वाचताना रामदास स्वामिंच्या ओळी थोड्या बदलाव्यास्या वाटल्या:

"दुःखाची घडी लोटतां दुःख आहे|
पुढें सर्व जाईल कांहीं न राहे||"

Darshana said...

nice one

Sadhana said...

Vachatana dolyat pani ale.

श्रद्धा said...

खरच डोळ्यात पाणी आणले तुम्ही. :(

Anonymous said...

Alakaa~Kharach, uchaki laagali tar phakta aai mhanala ki uchaki thaambate !Tu tar ticha naav lihilyaashivaay chir~vedanelaa punhaa ek.vaar donhi dolyaanmadhana waat mokali karoon dilis. Swami tinhi bjagaacha,aai.vinaa bhikhaari mhanataat te kitti khara aahe.asahi aapan aikatoch,ki devaalaa sagalikade jaana ashakya hota ; mhanoon tyaane aailaa paathavala....Aai~sagalyaat pahilaa aanisagalyaat mothaa guru....Aadya vidyapeeth.ch janoo....Gajabajalele gaav asata....alikade asa vhaayalaa laagalaya ki ichhaa asoonahi shakyato muk~samawaadaavar bhar....Tine etka sahan kelay, ki tilaa dukhawaayacha jivaavar yeta, mhanoon phakta Tichyaa Charan~kamalaanvar Doka Theoon Parataayacha. PREMASWA~ROOP AAI,WAATSALYA~SINDHOO AAI,BOLAWOO TUJ AATAA MI KONATYAA UPAAYI.....alakaa sundar lihites, chaloo thev likhaan.kaalaji ghe.~~chhakuli. praachikulkarni@yahoo.com

Prashant10122 said...

आठवण आली ....आईची ...आई च्या सर्व आठवणी साधारण सारख्याच जाणवतात ....शेवटी आई ती आईच

Alka Vibhas said...

@श्रद्धा, प्राची, प्रशांत and all: ही भावना सार्वत्रीक असल्याची जाणीव आणखी एका प्रकारे झाली. ’आठवणीतली गाणी’ वरील सर्वात जास्त ऐकले जाणारे गाणे हे ’ती गेली तेव्हा’ हेच आहे.

श्री said...

हूंSS !
दिड-दोनचा असेन . त्यामुळे काय गेलंय अजून उमगतंच नाही.
नि उमगतंय असं भासायला लागलं कि मग काही उमजतच नाही !
त्यामुळे कुंतीसारखं, वरच्यांची सगळी माझी म्हणून मागून घेतो-
म्हणजे तरी 'ती ' रहायचं सोडा, आठवात येईल तरी .....

Post a Comment