RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

मित्र


"माझं नं एकनाथांसारखं झालं आहे."
"काय झालं?
"आहेत माझ्या आयुष्यात काही विंचू. प्रत्येक interaction ला चावतातच. पण मी संत नसल्याने त्रास होतो. "
"बरी आहेस नं आई ?"
"का रे, काही चुकतं आहे का माझं ?"
"हो. खूप. आता तरी शीक ग..."

माझा पडलेला चेहरा पाहून त्याने मला जवळच्या खुर्चीत बसवलं. माझा हात पकडला.
"लक्षात घे, there are some lost causes in this world."
"पण आपण प्रयत्न तर करतच राहिलं पाहिजे नं. ते थांबवून कसं चालणार? म्हणतात नं, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे."
"कसलं त्रेता युगातलं, cliché वाक्य हे !!
अशा वेळेस नं आई, तू तुझा सगळा scientific temper गुंडाळूनच ठेवतेस.
विचार कर. वाळूच ती... silicon dioxide... SiO2... त्यात कुठले आले hydrocarbons? कितीही काहीही केलं तरी तेल निघणारंच कसं?"
वाळुतून तेल हे lost cause - नाही का?"
"हं...."
"त्यापेक्षा एका point नंतर 'not my kid, not my problem’ असं म्हणून बाजुला व्हायला शीक.
एकदा ठरवलंस नं की जमेलच तुला. बघ थोडी attitude adjustment करून."

माझ्या चेहऱ्यावर येऊ लागलेला confidence पाहून त्याने समाधानाने back-pack उचलली आणि त्याच्या विमानाच्या दिशेने निघाला.
माझ्या पासून अर्धा जग दूर... त्याची स्वत:ची रोजची लढाई लढायला... ताठ मानेने.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

12 comments:

हेरंब said...

मस्त लिहिलंय... आवडलं !

अनघा said...

:) शिकवते खरी ही नवी पिढी बऱ्याच गोष्टी. कधी आपण त्यांना शिकवत होतो आणि त्यांनी हट्टीपणा केलेला असतो. आणि आता ते शिकवत असताना पटत असून देखील नाही इतकं 'प्रॅक्टिकल' होता येत.

sahajach said...

मस्तच... नवी पिढी खरं तर खूप सुसंगत आणि सुटसुटीत विचार करू शकते...

सौरभ said...

:-S सू थयू???

Anonymous said...

Superb!!! A person becomes truely happy when he can learn from kids and unlearn his own ideas!!!

BinaryBandya™ said...

नव्या पिढीकडून पण शिकण्यासारखे आहे म्हणजे ....

Pralhad said...

This is Aashay.

Anonymous said...

आधीचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत चाल...

Nanda said...

खुप आवडलं. कळत पण वळत नाही. ही नवी पिढी किती हुशार आणी शहाणी आहे. खुप काही शिकायला मीळत त्यांच्याकडुन. त्यांच्या इतक प्रॅक्टिकल् आपल्याला होता आलं तर कीती बरं होईल.

अलका said...

@हेरंब: thanks

@BinaryBandya: खूप शिकण्यासारखं आहे. म्हणूनच तर ’मित्र’ म्हंटलं आहे नं !!

@सौरभ: कई नथी... सारू छे !! तुमच्यासारखे छान +ve attitude वाले young friends किती छान deal करता life... Was admiring that.

अलका said...

@अनघा, नंदा, तन्वी: Rather than 'practical approach', I would like to say, they are the best people to judge the environment around them. Their survival instinct tells them to react in a different way than us. आपल्याला पण सांगण्यात यायचंच की, ’प्रमाणामध्ये सर्व काही असावे’.

भानस said...

माझा लेकही बरेचदा असेच माझ्या डोक्यातले किडे काढत असतो... कधी काहीसे निघतातही. बरेचसे वळवळतच राहतात मात्र.

आजच्या पिढीने काही गणिते मनाशी मांडलीत आणि ती खरेच मन सुसह्य करणारी आहेत.

Post a Comment