RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

एक स्पर्श...


एक स्पर्श..... जीवनाचा... चिमुकला, लुसलुशीत... कुशीत वाढणारा.
एक स्पर्श..... सुरकुतल्या, थरथरत्या हातांचा... उबदार क्षमेचा.
एक स्पर्श..... कोऱ्या करकरीत कागदावरील छापील अक्षरांचा... उत्सुकता वाढवणारा.
एक स्पर्श..... वाकून केलेला, सश्रद्ध, आशादायी... त्या निराकाराच्या मूर्त रूपास.
एक स्पर्श..... नाळ तुटण्याआधीपासून ओळखीचा... मायेने ओथंबलेला.
एक स्पर्श..... मूल्य असलेल्या कागदांचा. भौतीक अस्तित्वाच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येणारा.
एक स्पर्श..... गर्भ रेशमी पदराचा... खानदानी, शालीन... आदराने मान आपसूक झुकवणारा.
एक स्पर्श..... कातर संधीप्रकाशातील गूढ सावल्यांचा... काळजाचा ठोका चुकवणाऱ्या भीतीचा.
एक स्पर्श..... गर्दीतला... असभ्य, किळसवाणा, अपवित्र.
एक स्पर्श..... निखळ, सुंदर मैत्रीचा... स्त्री-पुरुष भेदाभेद निर्थक ठरवणारा.
एक स्पर्श..... चमकत्या, झळाळत्या धातुचा... मोहमयी.
एक स्पर्श..... लख्ख... मनातला अंध:कार नाहीसा करणाऱ्या ज्ञानाचा.
एक स्पर्श..... काळ्याभोर सृजनतेचा... आकाशाला गवसणी घालू पाहताना पायाखालील भक्कम आधाराचा.
एक स्पर्श..... चांदण्याचा... दिल्या-घेतल्या वचनांचा, जन्म-सोबतीचा.
एक स्पर्श... वरवर कठोर... शिस्त, धाक असल्या शब्दांच्या आडून दिलेल्या अनुभवी सल्ल्यांचा.
एक स्पर्श..... हरवलेला... आठवांच्या तुडुंबात बुडून धूसर होत गेलेला.
एक स्पर्श..... थंड... निर्वाणीचा. पारलौकिकाच्या दिशेने घेऊन जाणारा.


Related posts :   वाफ

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

12 comments:

vicharyadnya said...

एक स्पर्श या काव्याचा हृदयाला स्पर्शिणारा आणि आनंदाविणारा , धन्यवाद अलकाजी!

mohana said...

alka ...khup sunder...ek sparsha...dolyatun ashruuu apoaap ale...khup chaan ahe

सौरभ said...

एक स्पर्श... कधीही नं झालेला... पण कधीतरी जाणवलेला...

very 'touchy' post... :)

अनघा said...

एक स्पर्श हरवलेला...सुंदर अलका. :)

sahajach said...

मस्त.... मनाला स्पर्श करणारी पोस्ट!!

BTW आपल्या दोघींच्या ब्लॉगचे नाव एकच आहे :)

तन्वी

Pralhad said...

एक स्पर्श... निखळ, सुंदर मैत्रीचा...
जवळ जवळ ३० वर्षे झाली ... we are friends !!

अलका said...

@anagha: हं. काय बोलू ? आहोत नं आम्ही....

अलका said...

@सौरभ: होईल हो... तो जाणवलेला स्पर्श लवकरच होईल. तेव्हा आमच्याशी share कर, बरं का !!!!!

अलका said...

@vicharyadnya: thanks allot..
@tanvi: हो ग, खरंच !! छान वाटलं ऒळख झाली ते.

अलका said...

@मोहना: support... नेहमीप्रमाणेच.

Maithili said...

खूप छान...
:-)

मी मराठी .... said...

Ase saglech sparsh aapan aayushyat anubhavatach asto. Ithe tya saglyana asa sundar ritine ekatra bhetun khupach chhan vatatay.

Post a Comment