RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

बाबुराव


त्याचं ते आगंतुक येणं कोणालाच आवडलं नाही. सगळ्यांच्या डोळ्यादेखत तो सुळकन्‌ घरात घुसला आणि कुठेतरी दडी मारून बसला. मूषक-पुत्रच तो... त्याला लपायला कितिकसा वेळ आणि जागा लागणार !

त्याच्या येण्याने रंगलेल्या गप्पांवर एकदम विरजण पडलं. फटाफट बाकीच्या खोल्यांची दारं बंद झाली. खालच्या फटींना सतरंज्या, चादरी लावण्यात आल्या. घरातले आई-बाबा काठी, कुंचा असली आयुधं घेऊन लढाईच्या पवित्र्यात उभी राहिली. छोट्या दोघांना गप्प बसण्याचा, हालचाल न करण्याचा सज्जड दम भरण्यात आला.

तो अतिशय चपळ आणि उत्साही होता. शेवटी पोरंच ते... कोणाचं का असेना ! त्याच्यासाठी सुरुवातीला हा लपंडावाचा खेळच होता... मग कुठे तो दमायला लागल्यावर त्याला हा जीवन-मरणाचा खेळ असल्याचं लक्षात आलं.

या युद्ध सदृश्य परिस्थितीत साधारणत: दोन तास गेले असतील. तेवढ्यात त्याने कुठली तरी एक फट मिळवली आणि आजोबांच्या खोलीत जीवाच्या आकांताने पळ काढला. सगळे हताश होऊन बसले.

तेवढ्यात कुणीतरी म्हंटलं, "बाबुराव आता अजोबांबरोबर वामकुक्षी घेतील."
"कोण बाबुराव ?"
"तेच ते. उंदराचं पिल्लू. रहाणारच आहे काही काळ आपल्याबरोबर तर त्याला एक छानसं नावच देऊ की."

त्या एका वाक्याने वातावरणातला ताण नाहिसाच झाला. मग काय, बाबुरावांच्या हालचालींचं live reporting कुणी न कुणी तरी द्यायला सुरुवात केली.
"बाबुरावांनी मुक्काम सध्या सोफ्याखाली हलवला आहे."
"कपाटाखालून बाबुरावांचे डोळे काय पण चमकतात !"
"बाबुरावांचा रंग काय मस्त shimmering black आहे. आई, same ह्याच colour चा dress हवाय मला."
"बाबांनी बाबुरावांची सुंदर कोंडी केली होती पण बाबांच्या हातावर तुरी देण्यात बाबुराव यशस्वी झाले आहेत."

दोन दिवसांनी घरातल्या छोटूचा फोन आला. "sad news आहे. बाबुराव expired. आम्हाला खरं तर त्यांना मारायचं नव्हतं, नुसतं घराबाहेर घालवायचं होतं. पण फटका जरा जोरातच लागला. मी आणि ताईने खाली एक खड्डा खणून त्यांना burial दिलं. वरती फुलं पण ठेवली. आज बाबुराव नाहीत तर घर कसं शांत शांत वाटतंय्‌."

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

12 comments:

अनघा said...

hehe!!! अलका, सुंदर सुंदर! :D

Anonymous said...

aprateeeeem alka. todach nahi. sarva prasang purna dolya samor ubha rahila.

Pralhad said...

Characterisation मस्त झालंय ... बाबुरावांचं !!!

aashay said...

very nice!
Reminds me of an episode of Friends where Phoebe has a rat named Bob and a mouse named Susie.

Sagar Oke. said...

I found this very touching..... somehow, dont know why. well picturised. Keep it up Alka.

सौरभ said...

बाबुराव!!! हाssहाssहाss शिर्षक वाचुनच दांडी गुल!!!
शेवट दुःखी असला तरी मला हसायला येत होतं. असो... हे बाबुराव निर्वतले. हरकत नाही. असे पुष्कळ मिळतील. (ह्यांच्यासारखे इतर अनेक बाबुराव घरात-अंगणात नांदोत अशी सदिच्छा द्यावी काय???) :P :D ;)

Maya said...

एखाद्या thought ने परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोण कसा बदलतो आणि पर्यायाने परिस्थितीच कशी बदलते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

अलका, what you are writing are called thumbnail sketches of life. G8. Keep it up.

Gouri said...

मस्तच आहे बाबुरावांची कथा :)

मनोज रावराणे said...

काय पण गम्मत आहे

Anonymous said...

Itukalaa Undaraacha Pilloo....Tumachaa Tat.kaaleen Anahoot Pavhana....Baabooraav Mhatala Ki Popat-Bipat Aathavato Baghaa...Ithe Tar Alakaachi Lekhani Kitti Bolaki jhaaliye....Aadhi Aathavala--Paraadhin Aahe jagati,Putra Manavaachaa Aani Nantar Aathvali Shabdan.madhana Chitra Ubhi Karaayachi Taakad Asalele "Lampan"kaar Prakaash Naaraayan Sant !Dhanya Aahes Tu , Alakaa !Lihiti Rahaa !~~Chhakuli(praachikulkarni@yahoo.com)

deepak said...

Hi,
It is tough for me to write in Marathi ... I would love to read a book authored by you !!
If you are reading this message please let me know

Deepak Nikam
deepak.panu@gmail.com

Alka Vibhas said...

@deepak: yes deepak, i have received your msg. Thanks a lot.

Post a Comment