RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

Sorted (2)


मध्यंतरी एकदा अनघानं एक प्रश्न मांडला होता. म्हणजे असे प्रश्न तिला आणि मला सततच पडत असतात. म्हणाली, "झाडांच्या कुंड्यांचं एक बरं असतं. किडे झाले की कुंडी खिडकीच्या जवळ, सूर्याच्या प्रकाशात ठेवली की ते निघून जातात. पण डोक्यातल्या किड्यांचं काय ? "

मी ही असंच उत्तर ठोकून दिलं होतं. "डोक्याचंही बहुतेक तसंच असावं. 'ज्ञानाचा प्रकाश' पडला तर त्या किड्यांची गच्छंती."

हे उत्तर दिल्यापासून सारखं guilty वाटतंय्‌. उगीच काही तरी बरळल्या सारखं किंवा अध्यात्मीक पोपटपंची केल्या सारखं. का बोललो आपण असं? मुळात गरजच काय होती असं पुस्तकी उत्तर देण्याची? आणि अनुभवाचं काय? आपल्या डोक्यातल्या किड्यांची वसाहत तर वाढता वाढता वाढे अशीच. मग कसला हा ढुढ्ढाचार्याचा आविर्भाव?
एका सहज संभाषणातून सुरू झालेला... ’आपुलाची वाद आपणांसी’, continued...

काल एका मित्राच्या घरी गेले. घरात नेहमीची नसलेली शांतता. लेकीला नुसत्या नजरेनंच विचारलं, "काय झालं ?"

"बाबा मन्यावर चिडलाय. अभ्यास करत नाही म्हणून. कुणीही त्याच्याशी बोलायचं नाही असं सांगितलंय्‌." एकटा पडला असेल बिचारा असा विचार करत २ रीतल्या मन्याच्या खोलीत डोकावलं. पुस्तक-वही-पेन्सील यांच्याशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत त्याने माझ्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, "कुणी आपल्याशी बोललं नाही तर आपण काही मरत नाही. फक्त आपल्याला काही वेळ ऐकू येत नाही. एवढंच."

त्या क्षणी तो एवढासा जीव माझ्यापेक्षा किती तरी sorted वाटून गेला.


Related posts:   Sorted ?,  Sorted (3)

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

7 comments:

Anonymous said...

शिकावे- कोणाकडूनही.

अनघा said...

छोटुसं पिल्लू एकदम मोठ्ठी गोष्ट सांगून गेलं ना! पण मला ते दुसरीतलं पोर एकटंच बसलेलं दिसतंय! :(

अलका said...

@अनघा: तुझ्याच जुन्या एका blog वर केलेल्या अविचारी comment चा किडा अजून छळतोय ग !!

श्यामली said...

क्या बात है! खरंच लहान मुलं ब-याच वेळा फार मार्मिक बोलून जातात...:)

सौरभ said...

अरे बापरे!!! seems like u need a deep Brainwash... आमच्याकडे या. आम्ही खुप दिवे लावलेत... ज्ञानाचे... :P ;)
बाकी टोणगं लई आगाऊ दिसतय. :) आवडलं मला त्याचं उत्तर. :D

अलका said...

@श्यामली: खरंय. पुढची पिढी.
@सौरभ: मिळालाय नं तुझ्या सारखा एक मस्त-बिनधास्त मित्र.. शिकवणी सुरू.. आज से?

प्रशांत आरणके said...

बहुदा त्याच्या आईने गर्भारपणात "घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती ' पुस्तक वाचले असावे !!!!!!!!!!!!

Post a Comment