RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

स्टेपनी


College मध्ये असताना अ. भा. विद्यार्थी परिषदेच्या कामाच्या निमित्ताने गावोगावी पुष्कळ प्रवास व्हायचा. बहुतेक ठिकाणी फक्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची गाडी... थोडक्यात S.T. bus च पोहोचू शकायची. या प्रवासांमध्ये दिसलेल्या ग्रामीण मराठी जीवनाच्या अनेक छटांनी आम्हा शहरी मुलांना कधी बुचकळ्यात टाकलं तर कधी आचंबीत केलं... पण त्यात नेहमीच जीवनाला थेट भीडण्याच्या, विजिगिषु वृत्तीचं दर्शन घडलं. हा प्रसंग मात्र अगदीच वेगळा.....

अशाच एका प्रवासात आमचा group एका bus मधे चढला. जेमेतेम उभं रहायला जागा. मी जिथे उभी होते त्या शेजारच्या बाकड्यावर एक मुंडासंवाले काका बसले होते. रापलेला, सुरुकुतलेला पण प्रेमळ चेहरा. वयाचा अंदाज लावणं कठीण. त्यांच्या पलिकडे २ बायका. डोक्यावरून पदर, हातभर गोंदण आणि बांगड्या. सतत एकमेकींशी काहीतरी बोलत, हसत होत्या. ते काका त्यांना दामटायचे. "गपा. कवाधरून कावकाव लावलीया." त्या २ मिनिटे गप्प बसायच्या की पुन्हा गप्पा चालू.

माझ्या नेहमीच्या सवयीने मी त्या तिघांमधील नात्याचा आणि त्या नात्याच्या quality चा अंदाज बांधत होते. अर्थातच त्यांच्यात खूप सख्य होतं, पण नातं ?
थोड्यावेळाने माझी दया येऊन त्यांनी मला टेकायला जागा दिली. सहज काकांना विचारलं, "कुठं चालला?"... "जत्रंला, आमच्या 'family' ला लई आवडतं".

त्या दोघींमधील नेमकी 'family' कोण हे न कळल्याने मी दोघींकडे मोघम नजर टाकली. माझा गोंधळ त्या तिघांच्याही लक्षात आला. त्या दोघी तोंडाला पदर लावून फिदिफिदी हसायला लागल्या. मग काकांनीच माझी अडचण दूर केली. "ते पल्याड बसलंय्‌ ते आमचं खटलं, हिकडं शेजारी बसलिया ती श्टेपनी"....... !!!!!!!

आज इतक्या वर्षांनी हे आठवायचं कारण ? कुठल्यातरी T. V. मालिकेत एक बायको आपल्या नवऱ्याचं लग्न दुसऱ्या कुणाशी तरी लावून देत होती. सात्वीक संतापाने चिडलेली मैत्रीण म्हणत होती, "काहीही दाखवतात मेले. reality शी काही संबंधच नाही."

Truth is stranger than fiction... Or... Fiction is just a reflection of truth?

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

9 comments:

अनघा said...

हाय राम! आणि दोघींत विनोद चालले होते?! :)

Anonymous said...

hahaha :)) stepny :)) bayako la sangato. baghu kaay reaction hote.

सौरभ said...

हाsssहाsssहाsssहाsss... "टायरं" एकसारखीच असली तर ठिक. नाहितर आहे मग मजा...

(अतिवाईल्ड इमॅजिनेशन करुन केलेला थोडा वाह्ह्यातपणा -
तेच काका असेच कुठेतरी भेटतात. त्यांना विचारणा होते "काय काका, खटलं दिसतय. श्टेपनी कुठे?"
काका - अवं आम्ची श्टेपनी दुसऱ्या गाडीला फिट्ट झाली आनी ती गाडी गेली भरधाव निघुन.) :P

Pralhad said...

मला आठवतंय हे. आपणच सगळे होतो. मराठवाड्यातलं कुठलं तरी गाव होतं. आणि ह्या shock मधून बाहेर यायला तुला कितीतरी वेळ लागला होता.

अलका said...

@सौरभ: सुटलायस्‌ रे... खूप मजा आली वाचून... LOL !!!

Sagar Oke said...

अलकाजी, फार छान चित्र उभे केलेत. असे प्रसंग ग्रामीण भागात फिरताना खूप वेळा अनुभवायला येतात, आलेत सुद्धा. परंतु तुम्ही त्याचे वर्णन मस्त केलंय. अभिनंदन !

Santosh Chaskar said...

haahahahah

deepak said...

It tickles my mind !!! How lovely it is to see the first woman not being jealous of steffanii ..
what shall I say .... is it her generosity or adjustment with life or moving on whatever comes in way or accept the inevitable owing to helplessness of being woman ..
After a thought I just say .if she is happy with stefanii .. she knows how to live better than anyone of us educated people !!!

Anonymous said...

mala khoopach awadla tumcha likhan

Post a Comment