RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

वाफ


समोरच्या पातेल्यात भाजी शिजत होती. तिचं ते खदखदणं तिच्या भोवती आणखीनच वाफ निर्माण करत होतं. त्या गच्च साठलेल्या वाफेचा दाब वरचं झाकण मुकाट सहन करण्याच्या प्रयत्नात... पण तो ताण असह्य झाला की ते बापडं किंचित उडी मारायचं आणि आतल्या थोड्याशा वाफेला बाहेर जाऊ द्यायचं. ना त्या वाफेला धग जास्त ना जोर. नुसती मधुनच 'बुडुक' करून बाहेर पडणार. कुणाला दुखावण्याची क्षमताच तिच्यात नव्हतीच.

हे सगळं कसं घरातल्या एखाद्या गृहीत धरलेल्या स्त्री सारखं... तिचा वैताग, अस्वथता ती शक्यतो आतल्या आतच ठेवणार. बाहेर पडेल तेव्हा सुद्धा 'minor irritation' च्या पलिकडे त्याचं कुणालाच महत्व नाही.

शेजारीच प्रेशर कुकर. त्यातल्या वाफेचं वागणं पण त्याच्याच सारखं भारदस्त. उगीच अधे-मधे बाहेर पडणार नाही. आतल्या आत शांतपणे जमत राहील. पण जेव्हा बाहेर पडेल तेव्हा मात्र जोरात.. आवाज करत. सगळं घर दणाणून सोडत. तरीही केव्हा थांबायचं हे ह्या वाफेला पक्कं माहिती. हिचा safety valve शक्यतो उडत नाही. जशी कुटुंबातली एखादी ज्येष्ठ व्यक्ती... कुठे, केव्हा, किती आवाज चढवायचा यावर संपूर्ण ताबा.

तिस-या शेगडीवरच्या तव्यावर पोळी. हिच्या वाफेला फारसा जोर नाही. पण कुठुन, कधी बाहेर पडेल ते सांगता येत नाही. चटका लावून जाणं हिला चांगलं जमतं. मग हात पाण्याखाली गेला तरी झालेल्या जखमेची हुळहुळती जाणीव बराच वेळ रहाणार. ही मात्र करून सवरून नामानिराळी. जशी एखादी चंट, तैयार, सगळ्यांना पुरून उरणारी ठमाकी. या unpredicatable, hurting nature मुळे सगळे हिच्याशी जपून वागणार.

प्रत्येक वाफेची बाहेर पडण्याची पद्धत वेगळी, परिणाम वेगळा. पण बाहेर पडणं मात्र आवश्यक.

माणसाचं खदखदणारं मन... तिथं साचणारी वाफ... तिचाही निचरा होणं नितांत गरजेचं. नाही तर काही काळाने depression चा स्फोट किंवा करपलेलं मन !!

पण त्या वाफेची बाहेर पडण्याची पद्धत, हा मात्र ज्याचा त्याचा choice.


Related posts :   एक स्पर्श

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

14 comments:

सौरभ said...

वाह वाह वाह!!!
रोज दिसणारी एक साधी गोष्ट इतक्या सोप्या पद्धतीने एका मोठ्या गोष्टीशी जोडलीये... खरंच, एकदम 'सहजच' आणि छानच जमुन गेलंय.
वाफ वाफ वाफ!!! oops... i mean वाह वाह वाह!!! ;) :D

Anonymous said...

’depression चा स्फोट किंवा करपलेलं मन’- वा.वा.वा.
भिंग घेऊन फिरत असतेस का ग? कुठेतरी focus करून क्षणात zoom in करतेस ते.

ash said...

kashli shonuli aahes tu, hats off!!!! baap lihilays tu..... claasss...

अनघा said...

अगं अलका, आपण फार सारखे विचार करतो का???!!
http://restiscrime.blogspot.com/2010/07/blog-post_14.html

:)

Pralhad said...

'हात पाण्याखाली गेला तरी झालेल्या जखमेची हुळहुळती जाणीव बराच वेळ रहाणार'.
असं येता-जाता सहजी दुखावणा-यांची संख्या आपल्या आसपास कमी नसते.

अलका said...

@सौरभ: तात्काळ and very supportive comment as usual. thanks.
@रमण: ha.ha.ha. इतकं चांगलं input देऊन u cannot stay anonymous.
@अनघा: खरंच ग !!!! असंच दिसतंय. क्या बात है ! aggreed
आपण ’फार सारखे’ विचार करतो आणि आपण सारखे ’फार’ विचार करतो.
@ashwini: काय ग हे.. तू कवयत्री. तुझं लिखाण वाचून आमचं असं होतं. btw 'तुजवीण सख्या रे’ चा title track मस्त जमलाय.

Southpaw29 said...

Your knack of finding similies in the simplest of things is amazing, Alka !!
Anonymous has hit the nail... keep writing, so that we can "zoom-in" on your posts

अनघा said...

"आपण ’फार सारखे’ विचार करतो आणि आपण सारखे ’फार’ विचार करतो." hehe!!! खरं गं बाई!!! पर कंट्रोल नहीं होता ना! :D

Maya said...

’सहजच’ शब्दात जीवनाची अवघड कोडी छान उकलून ठेवतेस. अशीच लिहीत रहा.

अलका said...

@माया: .... बापरे... काय ग हे माया !! जरा जपून.

श्रद्धा said...

जमलयं! इतकं छान आणि इतक्या साध्या उदाहरणातून ? मस्तच!

अलका said...

@श्रद्धा: thanks ग. ओळख झाली. आनंद वाटला.

मी मराठी .... said...

Aajubajula ghadnarya ghatnashi tumhi manavi manala khupach sundar pane jodlay.Shevat khupach upyukt sandeshane keli aahe.

भानस said...

अलका या वाफेच्या सॉर्टींगशी पूर्णपणे सहमत. डिप्रेशन आणि करपलेलं मन घेऊन काही मने उभं आयुष्य काढतात. :(

Post a Comment