RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

चेहरा


घरी जाताना दूध घेऊन जावे म्हणून गाडी पहिल्या दिसलेल्या सुपर मार्केटशी थांबवली. घाईतच दुधाचा कॅन उचलला आणि check out ला आले. एक counter बंद. दुसऱ्यावरची attendant आणि एक ग्राहक यांच्यात अरबीत चर्चा की वाद... देव जाणे... काही तरी चालू होते. शांतपणे थांबून राहिले. तब्बल पाच-सात मिनिटे गेली असतील.

तेवढ्यात कुठुनसा, तिथेच काम करणारा एक तरूण आला. counter चालू केले आणि म्हणाला, "इकडे या."
या अरबस्तानात, घरापासून दूर, हा अनोळखी माणूस माझ्याशी सरळ मराठीत बोलतोय? त्याच्या गणवेषावरचे नाव पाहिले. 'सादिक अहमद'.
न राहवून विचारले, "तुम्ही माझ्याशी मराठीत बोलताय. येतं तुम्हाला?"
"हो. मस्त. ठाण्याचा नं मी."
"पण मी मराठी आहे हे तुम्हाला कसं कळलं?"
"चेहऱ्यावरचं मराठीपण काही लपतं का?".

विचारांच्या नादात गाडीपाशी आले. ड्रायव्हींग सीटवर बसून बेल्ट लावता लावता rear view mirror मध्ये वाकून, वाकून बघितलं. कुठे आहे हे चेहऱ्यावरचे मराठीपण? ना गळ्यात मंगळसूत्र, ना कुंकू, ना हातभर बांगड्या. साधं jeans, t-shirt आणि कापलेले केस. कुठलाच typical 'मराठी' साजशृंगार नाही.
की ’मराठीपण’ म्हणजे, मी मगाशी रांगेत दाखवलेली चांगल्या शब्दात 'सबुरी' किंवा स्पष्ट शब्दात 'भिडस्तपणा'?

न राहवून परत दुकानात गेले. त्याला विचारलं, हे चेहऱ्यावरचं ’मराठीपण’ म्हणजे काय? तर म्हणतो कसा, "बस्स का... ते असतंच. असं सांगता नाही येत."
माझ्या डोक्यातील किड्यांच्या वसाहतीत आणखीन एकाची भर पडली.

बेरकी, साळसूद, निरागस, हासरे, आढ्यतेखोर, प्रांजळ अशा अनेक ’पणा’ मिरवणाऱ्या चेहऱ्यांनी परतीच्या प्रवासात घेरून टाकलं. खऱ्या जगातले, FB सारख्या virtual जगातले, प्रसंगी भेटणारे, अप्रसंगी टाळावेसे वाटणारे, कितीतरी... त्यांच्यावरचे हे भाव... किती खरे? की नुसतेच आविर्भाव? की हे भाव म्हणजे बघणाऱ्याचे perception... सापेक्ष.

कुठे तरी वाचलं होतं, 'You can take a person out of his country, but not the country out of the person.' ... इथे चेहऱ्याचं वांशिक मूळ असणार.
असंही म्हणतात की 'चाळिशी नंतरचा चेहरा हा तुमचा खरा चेहरा असतो.' ... म्हणजे चेहऱ्यावरचे भाव ही माणसाची आयुष्यभराची कमाई तर.
की शांताबाई म्हणतात तसं... ’हे रान चेहऱ्यांचे माझ्या सभोवती....... हे रान चेहऱ्यांचे घेरीत मज ये असे, माझ्याही चेहऱ्याची मजला न शाश्वती.’

मी आणि माझ्या डोक्यातली ever increasing entropy !!!

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

12 comments:

सौरभ said...

>> "चेह-यावरचं मराठीपण काही लपतं का?"

बिल्कुल बिल्कुल... अज्जिबात लपत नाही. मी माझाच अनुभव सांगतो ना... परदेशात कितीतरी भारतीय दिसतात, त्यांना लांबूनपण त्यांच्या चेहऱ्यावरुन ओळखू शकतो की कोण गुजराथी, कोण मराठी, कोण पंजाबी... अगदी कित्येकदा राज्याच्या कोणत्या प्रांतातला आहे त्याचापण अंदाज बांधू शकतो.

प्रशांत दा.रेडकर said...

खुप छान अनुभव आहे.
माझ्या अनुदिनीचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/

sahajach said...

अगं अगदी नेहेमी येतो हा अनूभव... चेहेऱ्यावरचं मराठीपण आणि वागण्यातलं मराठीपण लपवता लपत नाही... आम्हालाही असेच जवळपास सगळीकडे मराठी बोलणारी माणसं भेटतात... अगदी मुळची भारताच्या कोणत्याही भागातून आलेली पण काही वर्ष मुंबईत राहिलेली माणसं ही भेटतात, आणि आपल्याला अचूक हेरतात :)

मस्त झालीये पोस्ट...

Pralhad said...

गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कसा होतो मलाही आठवावे लागले...

वंश, देश, स्वभाव, परिस्थिती, आयुष्य सगळे आपला चेहरा घडवत असतात, आणि म्हणूनच सतत बदलत जाणारा, स्वत:चाच चेहरा !!

rajiv said...

चेह-यावरचं मराठीपण काही लपतं का?"


alka , ........ रक्तात पिढ्यान पिढ्या मुरले आहे, जे कितीही प्रयत्नांती लपवता येत नाही ते कसे लपेल ?

अनघा said...

अगं, एव्हढे तिथे कायकाय मराठी कार्यक्रम करत असतेस! त्यातून ओळखीचा नसेल का झाला आता तुझा चेहेरा?! :)

माझ्या नवऱ्याच्या मते दुबईतील दुकानदारांना मी श्रीलंकन वाटत असे! :D

छान झालीय पोस्ट! विषय पण छानच आहे! :)

अलका said...

@Rajiv: खरंय.रक्तातल्या पिढ्यान पिढ्या.. genes play a big role.

@Prashant: thanks. नक्की वाचेन.

अलका said...

@Saurabh, Tanvi, अनघा: परदेशात रहाणाऱ्यांना हा अनुभव वारंवार येत असतो. कधी आपण कुणाचे तर कधी कुणी आपले, हे असले evaluation करतच असतो. त्यातील पुढील धोका हा ’profiling’ चा...

Maya said...

हे रान चेहऱ्यांचे... क्या बात है ! त्यातील ह्या २ ओळी पण soild आहेत.
घेऊन गूढ पोटी विक्राळशा गुहा...........प्रत्येक चेहऱ्याच्या आडून पाहती.

’अवघड’ अजून ’सहजच’ झालेले दिसत नाहीये. :(

PIN@LL said...

Kharach..pardeshat rahila ki apan lagech olakhu shkato kon marathi ahe ani kon kuthlya prantacha ahe..karan palyala palya lokanchi ood asate... tasa apan aplya deshat nahi shodhat.... mast khup avdala.... me pan UAEt rahat aslyane khup apala vatala vachun mazyach manatala ek vichar vatala... :)

इंद्रधनू said...

छान पोस्ट.. असा कधी विचार नव्हता केला.. पण आता वाटतंय इथे पुण्यातही एखाद्याकडे नुसतं पाहूनच आपल्याला समजतं की कोण मराठी कोण अमराठी ते... त्यासाठी criteria असा काहीच नसतो.. आपल्याला ते असंच just समजतं... :)

भानस said...

अगदी अगदी! चेहरा बरीच गुपिते सांगून जातोच आणि आपला मराठीबाणा दिसतोच. :)

मस्त अनुभव आहे हा आणि पोस्टही.

Post a Comment