RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

शब्देंविण संवादु


बरेच दिवसांनी खालच्या gym मध्ये गेले. आत कुणीच नव्हतं. फक्त ती एकटीच बसली होती. खुर्ची खिडकीजवळ ओढून. कदाचित खालच्या lagoon कडे पहात किंवा कदाचित शून्यात. हातात cigarette. चेहरा खूपच गंभीर, सहसा तसा नसलेला. मला पाहिल्यावर तिच्या नेहमीच्या melodramatic, loud style ने म्हणाली, ’कुठे होतीस इतके दिवस? किती वाट पाहिली.”

हे वाक्य इथे जरी ’शब्दात’ लिहिलेलं असलं तरी तसं बोललं मात्र गेलं नाही. कारण आमच्या संवादात शब्द आभावनेच येतात. ती इराणची. माझं अरबीचं आणि तिचं English चं ज्ञान मोजून १० शब्दांपलिकडे नाही. शरीरयष्टी, रंग, संस्कृती, भाषा, lifestyle अशा किती तरी मुद्‌द्यांवर संपूर्णत: भिन्न असलेल्या आम्ही दोघी, इन-मीन २० शब्द आणि अगणित हातवारे यांच्या मदतीने अनेक विषयांवर ’बोलतो’. थेट अगदी आपल्याकडे जसा दृष्ट न लागण्यासाठी मीठाचा वापर होतो तसंच इराणमध्ये पण वाईट नजर घरावर पडू नये म्हणून मीठच वापरतात, असल्या चर्चे पर्यंत काहीही. माझ्या कपाळावर अधून-मधून दिसणाऱ्या कुंकवाचा आणि ’नवरा’ या entity चा काहीतरी संबंध आहे, हे तिला आमच्या गप्पांमधून कळलेलं. त्यामुळे माझ्या नवऱ्याची चौकशी करताना ’क्खुंक्खू’ म्हणत प्रश्नार्थक चेहरा करते.

तिला माझं नाव बऱ्यापैकी उच्चारता येतं कारण ’अल्‌’ आणि ’का’ यांचं अरबी मूळाक्षरांशी साम्य आहे. माझ्यासाठी मात्र ती, ’ती’ च.

आज mood एवढा का गेला म्हणून विचारायला तिच्या जवळ गेले. तिच्या हातातली cigarette काढून विझवली. ग्लासभर पाणी घेऊन आले तर तिचेच डोळे पाण्याने गच्च भरलेले. माझे हात पकडून म्हणाली, ’क्खुंक्खू.... संदूक... ’ आणि समोरच्या पाण्यात बुडवण्याची action.

मला कळलं... म्हणजे वैताग नवऱ्यावर आहे तर ! मग फारसं काळजीचं कारण नाही. नेहमीचच. पुन्हा एकदा तिची typical इराणी melodramatic, loud style. आज हिला हिच्या नवऱ्याला एका पेटाऱ्यात बंद करून समोरच्या पाण्यात बुडवण्याची इच्छा होत आहे तर!

’दे टाळी ! मला...’ असं खोडसाळपणे म्हणण्याचा मोह प्रसंगाचं गांभिर्य पाहून आवरला. पुढचा अर्धा तास ती जे काही सांगत होती ते शब्दश: नाही तरी ’त्या हृदयीचे या हृदयी’ खूप छान पोचलं.

मला नं या आमच्या शब्देंवीण संवादाचं कोण अप्रूप आहे. कारण ज्याच्याशी असा संवाद खरं तर जमायला हवा होता, तिथे ’सिखों ना, नजरों कि भाषा पिया’ अशी कथा आहे. पूर्वी एकदा हा प्रयोग मी करून पाहिला होता. १५-१६ माणसांमध्ये diagonally opposite बसलेल्या नवऱ्याला देहबोलीने काहीतरी सूचवायचा प्रयत्न केला तर त्याने खणखणीत आवाजात सांगितलं होतं, “जरा स्पष्ट सांग. मला असल्या खाणाखूणा काही कळत नाहीत.”

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

9 comments:

अनघा said...

:D अल - का - यदा ! आहेस खरी !
'नजरों की भाषा' ही सर्वात कठीण भाषा आहे! नाही का?! :)
नेहेमीसारखंच मस्त लिहिलं आहेस!

अलका said...

आवडलं. अल - का - यदा ! ... hahaha !!
आहेस खरी सख्खी मैत्रीण. स्वत: इतकं सुंदर लिहीतेस, पण सतत उत्तेजन देतच असतेस.
तुझं blog-book मिळणार का आम्हाला आता दुकानातून विकत? कुठे ते सांग.

Pralhad said...

baayaka. bhasha yevo athva na yevo. badbad chalu... :))))

svpneuro said...

have you read ' men are from mars and women are from venus .Body language is difficult for a man to understand because the evolutionary changes in the brain .So forgive your husband !!

Vinayak Pandit said...

अलका! तुमची पोस्ट आवडली! शेवट अगदी पटला!:D

हेरंब said...

>> “जरा स्पष्ट सांग. मला असल्या खाणाखूणा काही कळत नाहीत.”

हाहाहाहा.... घरोघरी !! :P

Jannhavi said...

thats the imp of a GF in a woman's life.

Maya said...

u r right Janhavi. एका स्त्रीचं मन समजायला दुसऱ्या स्त्रीचं मनच लागतं. तिथे संवादासाठी भाषेची गरज लागत नाही.

सौरभ said...

:)) >> baayaka. bhasha yevo athva na yevo. badbad chalu... @pralhad lolzzz

Post a Comment