RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

डोह..


मध्यंतरी समृद्धीने FB वर एक link पाठवली. त्यात भालचंद्र नेमाडेंच्या ’कोसला’ आणि J. D. Salinger यांच्या ‘The Catcher in the Rye’ या दोन पुस्तकांचा एकत्र विचार करण्यात आला होता. यावर आमच्या छान गप्पा झाल्या. पण मग पुढे जाऊन तीच म्हणाली, ’कोसला’ हा कदाचित नसेल original thought, हे कळल्याने किती फरक पडतो?

बोलता बोलता तिला म्हंटलं गेलं, ’हो खरंय, प्रत्येक डोहाचा तळ गाठायला हवा असे नाही.’

इथे विषय ’कोसला’ हा अर्थातच नाही. ही ओळ ज्या कवितेतील आहे, ती वैभव जोशींची कविता हा आहे. साधारणत: तीन वर्षांपूर्वी वाचलेल्या आणि तेव्हापासून सतत मनात घोळत राहिलेल्या या ओळी, वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारे भीडत गेल्या.

एखाद्या mature मैत्रीत कधी हे काव्य जाणवले तर कधी चिकित्सकपणे उहापोह करण्याच्या नादात हरवलेल्या सौंदर्यदृष्टीत. घरातल्या माझ्या सगळ्यात आवडत्या जागी- झोक्यावर बसून खाली दिसणाऱ्या पाण्याकडे पाहताना आणि मुंबईत गेल्यावर बाबांच्या समोर नुसतं बसून रहाताना सुद्धा. आज तीच कविता आवर्जून कराविशी वाटतेय. कवितेचे नाव आहे-डोह..
एखादा डोह असू द्यावा.. अथांग
कुठल्याही क्षणी हक्कानं जावं
आपलं प्रतिबिंबही पडणार नाही
अशा अंतरावर बसून बघत रहावं..
आपण डोहाकडे,
डोहाने आपल्याकडे..
ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा
ना त्याच्या पाण्यावर तरंग
मुळात अपेक्षाच नसतील तर कसला आला अपेक्षाभंग ?
डोळ्यांनीच विचारावं त्याला
हा स्थायी स्वभाव कुठून मिळाला ?
अन् हलकेच एखादं पान सरकवत त्याने दाखवून द्यावं
बरीच आंतरिक उर्मी आहे.. पण तळाला !
अशावेळी,
ते पान परत पाण्यात सोडून द्यावं.
हाती आलेला प्रत्येक पुरावा वापरायला हवा असे नाही,
प्रत्येक डोहाचा तळ गाठायला हवा असे नाही.

- वैभव जोशी


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

12 comments:

Anonymous said...

Let there be space.

Samruddhi said...

Vaibhav Joshi yanchya kavita mala pan khoop avadatat.

mvkapuskari.blogspot.com said...

Sundar Kavita...

Ramakrishna Parsekar said...

Pratekala dohachi garaj aste.... ata hi garaj mhanavi ? ki ...tila chirantan manavi iccha mhanavi he kalat nahi ..

Parantu...tya doha madhla ani tumchya madhla nirapeksha bhav ..ha kadachit kavite madhech asu shakto ...manavi manala nirapekshata..kalte ti phakta shabdanchi ....tasa wagna ..manavi manala ullangun jana nahi ka ?

Sanjay G said...

फारच छान कविता!असेच जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन मिळावा निरपेक्षपणे

Pralhad said...

यावरून एक छानसं गाणं आठवलं- ’या बकुळीच्या झाडाखाली आठवणींची लाख फुले.. बकुळी माझी सखी जीवाची.........’

THE PROPHET said...

कविता तर सुंदर आहेच पण Catcher in the Rye बद्दल उत्सुकता चाळवली गेली. धन्यवाद!

केदार said...

कविता सुंदर. आपल्याला गझलांचीही आवड दिसते..

अनघा said...

'कोसला' वाचली आहे. तेव्हा आता ‘The Catcher in the Rye’ शोधायला हवंय. :)
कविता सुंदर आहे. :)

सौरभ said...

वाह.. कविता कमालच आहे...

Anonymous said...

Gr8...already read many times and of course very like it....subhash punde..

भानस said...

फारच सुंदर दृष्टिकोन आहे. कविता अप्रतिम!

Post a Comment