RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

Integrity


ह्या प्रसंगाने खरोखरीच खूप अस्वस्थ केलं आहे.

तब्बल ४ वर्षांनी Make-A-Wish Foundation मधून फोन आला. जुन्या-नव्या स्वयंसेवकांचे छोटेसे संम्मेलन आयोजीत केलं होतं. साधरणत: १३ वर्षांपूर्वी MAWF ची दुबई शाखा लॉरी डिल्लनच्या पुढाकाराने आणि समरीन मलिकच्या साथीने सुरू झाली. पहिल्या काही दिवसातच मी त्यांना सामील झाले. आम्हां तिघींची एक टीम होती जी इथल्या बदलत्या, प्रवाही जनसंख्येमुळे फुटली. लॉरी कॅनडाला परत गेली, समरीनने पाकिस्तान मार्गे अमेरिकेचा रस्ता धरला. मीही नंतर ह्या संस्थेपासून विलग होत गेले.

मोजकीच मंडळी बोलावलेली. इतक्या वर्षांनी गेल्यामुळे ओळखीचे कोणीच नव्हते. नाही म्हणायला भारतीय वंशाचे एक-दोन चेहरे दिसले. जमलेले सगळे वेगवेगळ्या देशांचे असल्याने अशा वेळेस गप्पांचे विषय हा एक वेगळाच ’विषय’ असतो. आधीच ओळख नाही त्यात देश, संस्कृती, सगळंच भिन्न. टी.व्ही. वरच्या कार्यक्रमांवर गप्पा चालू असताना एक युरोपीयन महिला म्हणाली की अलीकडे तिला तिच्या टी.व्ही. वर दोन हिंदी सिनेमांचे चॅनल्स्‌ दिसतात. तिला हिंदी अजिबात कळत नाही पण चॅनल सर्फींग करताना दिसलं. हे ऐकता क्षणी तिथल्या दुसऱ्या भारतीय महिलेने तिला विचारले, “त्या चित्रपटांतील गाणी पाहिली ?”
"Yeah, interesting."

Profiling करणे हे चूकच. व्यक्तीचा काहीही अनुभव नसताना केवळ वंश, देश, त्वचेचा रंग, धर्म, जात अशा अनेक गोष्टींवरून तिच्याबद्दल साचेबद्ध मत तयार करणे योग्य वाटत नाही. तरीही काही विशेषता असतातच. वरील संभाणातील भारतीय महिलेचा लागलेला किंचित चढा स्वर, बोलताना केलेले हातवारे आणि तिला मिळालेल्या उत्तरातील subtle English sarcasm ने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

उत्तरातल्या ‘interesting’ या शब्दातला खोचकपणा संपूर्णत: दुर्लक्षित झाल्याने आणि स्वत:ला मिळालेल्या लक्षाने त्या बाईंना चांगलाच चेव आला. “Yeah, they are. Did you see the two flowers or two birds? That’s how love is shown in Hindi movies. They are suggestive ONLY in movies. And this is the country that produces so many children every year. One billion plus population.. hmm... Do you believe India is the country where certain subjects are not discussed public? Yet the whole world knows what they do in private ……… In some states they even force the woman to marry her late husband's younger brother ..... "

उपस्थितीत सगळे आवाक. बाई थांबायचं नावच घेइनात. मी मधे काही बोलण्याचा प्रयत्‍न केला. पण बाईंनी असा काही आवाज लावला होता की आम्ही दोघी अमर्त्य सेनच्या The Argumentative Indian ची उदाहरणं झालो असतो. म्हणून मी माघार घेतली खरी, पण ....... चुकलं का ?

एका टोकाच्या अस्वस्थतेने घेरलं आहे. काय हे ? ही कुठली.. कशाची तीव्र इच्छा, जी इतकं बोलायला लावते? नेमका उद्देश तरी काय होता? लक्ष वेधून घेण्याचा आटापिटा म्हणावं तर बाई अती समृद्ध घरातल्या वाटल्या. देशाभिमान नाही म्हंटलं तर, कितीही वर्ष दुबईत राहिलं तरी रहायचं ते भारतीय पासपोर्टवरच.

माझ्या पुरतं एवढंच सांगता येईल, ज्या क्षणी मी भारताबाहेर जाण्यासाठी immigration clear करते त्या क्षणापासून, चालता-बोलता, बसता-उठता, विमानात-विमानतळांवर, दुकानात-रसत्यांवर, ज्या देशात असेन तिथे.... मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करते, भारतीयांबद्दल इतरांच्या मनात तयार होणाऱ्या प्रतिमा-प्रक्रियेचा मी एक भाग आहे, हे भान विसरताच येत नाही.

Make-A-Wish Foundation ही 'terminally ill' लहान मुलांची, जवळ-जवळ शेवटची, एक इच्छा पूर्ण करणारी संस्था आहे. साधारणत: इथे भेटलेल्या एकेका मुलांबरोबर घालवलेला वेळ हा अस्वस्थ करून जाणारा अनुभव असायचा. पण ते सांभाळायला शिकले होते.
ह्या बाईंच्या बोलण्याने कदाचित त्यापेक्षाही जास्त अस्वस्थ केलं आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

17 comments:

Anonymous said...

ooooffffff !!!! :(

Anonymous said...

are deva.

Anonymous said...

Let me clarify first that I have worked at multiple workplaces and this is not a generic example that I am giving here.

I had to experience similar conversations everyday during office lunch hours at a particular IT company from my native city in India. I left that job after few months.

Such conversations remind me of The Man Without a Country.

Anonymous said...

आल्हाद: ह्या नतद्रश्ट लोकांकडे लक्ष देऊ नये, पण त्यांच्यामुळे जे नुकसान व्हायचे ते होतेच.

Pradnya said...

I agree with you. When we pass the immigration, we represent our nation at everyplace we visit. And everyone should understand this thing outside India.

Anonymous said...

tuzi samajut nahi ghalat pan ek anubhav sangate.us la janyapurvi mazya matrinichi dental treatmant chalu hoti.dentist chya sallyapramane te kam ardhech thevun ti tikade geli. madhyech ekda ticha dat dukhu lagala. lek tila dentist kade jayacha agrah karanar he swabhavik hote.pan hi mhanali,nako.mazi dental treatmemt ardhyavar sodleli ahe.ithala dentist
nave thevil.gairsamaj hoil tyacha.thambel maze dukhane.nahi tar mag baghu kay karayache te.tiche dukhane thamblehi nantar.

Samruddhi said...

tya situation madheel tuzya helpless ne tula jast tras zala asel. knowing you... ’संवेदनशील मनाचे परिणाम. बाकी सगळे चलता है, होता है, उसमें क्या बडी बात है’ वाले.

Pralhad said...

The question that is bothering you that did you make mistake in keeping quite, I don't think so. Even God helpless against stupidity.

Sachin Sabnis said...

काही लोक कुठे काय बोलतील याचा नेम नसतो
जरा संधी मिळाली कि सुरु होतात
समोरचा ऐकतोय कि खेचतोय हे त्यांना उमजत नाही
अशां व्यक्तीचे बोलणे अधिकृत किंवा सिरीयसली घेतले जात नाहीच.

alka said...

@Sachin, Samruddhi: खरंय. Normally, हे प्रत्येकाचे मत म्हणून सोडून दिले असते. इतर देशांच्या लोकांसमोर नको होते घडायला असं मात्र नक्की वाटलं.

@Pralhad: I may not make such a strong statement. Would like to quote Ayn Rand here. "Reason is not automatic. Those who deny it cannot be conquered by it."

Anonymous said...

These days it is rather difficult to find things to be proud of. This is the result of that feeling.

Anonymous said...

You should name your blog- खमंग आणि खुसखुशीत

Anonymous said...

He kharch manala tras denarach aahe. pan yahi peksha tras hoto to kadhi aaplich manase swatahachyach deshala, mansanna, system la , swachchhatela nawe thewtat, agadi wabhade kadhtat tewha. Mazi ek maitrin Manchester madhe settle zaliy. Ajun Indian passportwarch aahe pan Europe kasa chhan well planed well mannered, wellbehaved well diciplined wagaire wagaire. Mala ek kalat nahi desh, system hi aaplyapasunch banate mag aapan tikade ekdum shistshir wagto tech aaplya deshat wagto ka/??? nahi tar ka nahi???? Khartar bhartabaher jawun bhartabaddal waieet bolane he status zalay ka??? I wonder??? Kuthe boltoy kunasamor boltoy yacha kahi pochch rahila nahiy.....Anyway khup tras hoto nakkich!!

DipesH- said...

Rang de basanti.... athavtoy tyat ami khan cha ek mast dialogue ahe "koi bhi desh perfect nahi hota use beheter banana padta hai .." aplya desha baddal aplyala abhiman ahe ani to asala pahije asa pratidnyet mhantalach ahe. kahi jan tar ti pratidnyet ata visarun pan gele astil... pan kuthe tari aplyala aplya deshabaddal prem asel tar pratyeka ne tya karita jababdari ne wagala pahije.. swades cha ek mast sub-title ahe "we, the people"

alka said...

@DipesH- : Very true. शाळेत असताना एक लेख होता शिकायला. बहुतेक श्री. म. माटे यांनी लिहिला होता. ’देश म्हणजे देशातील माणसे’ !!

THE PROPHET said...

I think, we should rather represent ourselves as a human being, because by trying to represent our country, we actually try building a stereotype. and in any case, our Passport by default links us to our country.
I am not countering your argument, just felt bad for the Indian woman, who gets to be the wrong one, while the white woman who judges with prejudice, gets away being the part of 'British White Sterotype'.
Pan lihinyachi paddhat aawadali :) uttam blog aahe.

Ninad Kulkarni said...

माझे नाव निनाद कुलकर्णी.
लंडन मध्ये शिकून नोकरी व तेथेच जर्मन छोकरी शी लग्न करून सध्या आम्ही जर्मनी मध्ये रहात आहोत ( आमची कामाची शेत्र म्हणजे पंचतारांकित हॉटेल )
तर नामाला घडाभर झाल्यावर मूळ मुद्दा
भारतीय समाज जीवनात काही विस्कळीतपणा जाणवतो. पण त्यावर बोलण्याच्या गोर्यांना काहीच अधिकार नाही.
अश्या प्रसंगी रंग दे बसंती मधील , कोही भी देश , समाज परफेक्ट नही होता ,उसे परफेक्ट ... हा डायलॉग इंग्रजीत अनुवादित करून सांगायचा
त्यांच्या समाजात वाढते घटस्फोट सांगून म्हण्याचे
उगाच चर्च मध्ये आणाभाका घ्यायची नौटंकी कशाला करतात. ?
मुळात दोन प्रगत ,सुशिक्षित ,सुसंस्कृत लोक एकाच छताखाली का नांदू शकत नाहित?
म्हणजे दुसर्या म्ह्युद्ध्ध्याच्या काळातील जोडपी कशी एकत्र रहात होती.
ह्यांच्याकडे लोकांना उच्च शिक्षण सोय असून सुद्धा का विद्यार्थी घेत नाहीत .
का भारतातून शिष्य वृत्ती देऊन मूळ ( गुणवत्ता ) तुमच्या देशात बोलावली जातात.
आज मुलगा ड्रग्स घेतो हे कळल्यावर आई बाबत हतबल पणे आलीय भोगा म्हणत का गप्प बसतात.?
कुमारी माता हा प्रश्न का निर्माण होतो.
लहान वयात मूळ कायद्याने मान्य नसले तरी दारू , लैंगिकता . सिगरेट ह्यांच्या नदी का लागतात.
त्यांना शेवटी सांगायचे
एक बोट दुसर्यावर त्यांच्या समाजाच्या विसंगतीवर उठवले तर तीन बोट तुमच्या कडे तुमच्या समाजाकडे रोखली जातात..

Post a Comment