RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

Sorted (3)


५-६ महिन्यांपूर्वी गॉगलसाठी एक नवीन case आणली. आधीची खूपच bulky असल्याने पर्समधील बरीच जागा ती घ्यायची. त्यामुळे पर्स मधून काही काढणे, या साध्या गोष्टीसाठी तीमधे हात घालून, अंदाजपंचे शोधाशोध करण्यात खूपच वेळ जायचा. ही नवीन case छान छोटिशी असल्याने ते frustration वाचणार होते.

पण मग एक नवीनच त्रास सुरू झाला. त्या नवीन case मध्ये गॉगल चटकन बसायचा नाही. तो बसवण्यासाठी त्याच्या बाजू अनेक वेळा उघडणे, त्या वेगवेगळ्या प्रकारे fold करणे, गॉगलचा angle बदलून पहाणे, कधी उलटा तर कधी सुलटा ठेवणे, असं बरंच काही- सगळे permutations and combinations- तेही बहुतेक वेळा कुठुन तरी कुठेतरी जाण्याच्या घाईत किंवा कोणाशी बोलता-बोलता. नवीन वैताग.

आज शेवटी शांतपणे गॉगल आणि case, दोन्ही घेऊन बसले. तो नेमका कसा घडी करून कु्ठल्या angle ने ठेवायला हवा, याची एक निश्चित पद्धत ठरवली. हे करायला जस्तीत जास्त एक मिनिट लागलं असेल. sorted !!

किती किरकोळ गोष्टीवर वैतागण्यात केवढा वेळ गेला. हे जर आधीच केलं असतं तर?


Related posts :   Sorted ?,   Sorted (2)

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

6 comments:

Anonymous said...

Absolutely.

Anonymous said...

हे सगळं मनात येते, पण ते इतक्या सुट्सुटीतपणे मांडणे :-)

Anonymous said...

anubhav ghene
tyavar vachr karana
te vichar susangatpane mandana
ani te dusaryaparyat pohochavana
ani dusaryani"are ,kharech ki' ase mhanana
shivay 'like'karanakiti sundar pranali.
sudha gune

Anonymous said...

So many things to ponder on over a cup of coffee !

Shaapit Yaksha said...

hi i visit ur blog frequently, n i like ur writing. I also created a new blog plz go through it and i will like if u share ur views and suggestions about my blog...
http://shaapityaksha.blogspot.in/

alka said...

@Shaapit Yaksha: Sure, will visit your blog.

Post a Comment