RSS

In this assembly, where
even the sun is counted
amongst particles, it is
not polite to attach
importance to oneself.

किती तरी दिवसात


"आजकाल कसं झालंय माहिती आहे का... जिस गली में internet ना हो बालमा, उस गली से हमें तो गुजरना नहीं ।"
असं ऐटीत कुणाला तरी म्हंटलं खरं...

पण बदलती जीवनशैली कशी अंगात भिनली आहे, तिच्या चक्रात नकळत कसे गुरफटलो आहोत, याची खाडकन जाणीव झाली.

शाळेत शिकलेली मर्ढेकरांची कविता, तेव्हा जेवढी समजली नाही त्याच्या कैक पटीने आज समजली.


किती तरी दिवसात नाही चांदण्यात गेलो;
किती तरी दिवसात नाही नदीत डुंबलो

खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी जुनीच;
आणि वाहत्या पाण्याची शीळ ओळखीची तीच

केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाईन निर्भय;
गावाकाठच्या नदीत होईन मी जलमय

आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढी

बरा म्हणून हा इथे, दिवा पारवा पाऱ्याचा;
बरी तोतऱ्या नळाची शिरी धार, मुखी ऋचा !

- बा. सी. मर्ढेकर

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

9 comments:

Pushkar Kulkarni said...

ह्या कवितेचे स्मरण करून दिल्याबद्दल खरंच धन्यवाद!

पुलं म्हणतात तसं - "मेंदूतल्या विचारांचं डिपार्टमेंट आठवणीच्या फायली शोधण्यात गुंतलं."

Anonymous said...

हो. खरंच. कवितेची आठवण करून दिल्या बद्द्ल धन्यवाद तर आहेतच आणि हे पण खरंच आहेत, मागे वळून पहाणे कितीही ’रम्य’ असले तरी तेथे ’रमणे’ आता अवघड आहे. - सुदीप पटवर्धन

केदार said...

अलका,

आजकलतो हफ्तेमें कमसेकम एकबार लॉगिनकिये बगैर दिल नही भरता.

जुनी कविता वाचायला छान वाटली. गेलात का मग तुम्ही चांदण्यात भिजायला ?

alka said...

@केदार: हो. ठरलं. आता जाणार आहे. २७ जूनला. :-)

केदार said...

हा दिवस विशेष आहे का..?

alka said...

दिवस खास नाही... खूप जुना कंपू नाशिकला भेटणार आहे. त्यामुळे जागा आणि माणसं खास आहेत.

भानस said...

मर्ढेकरांची एक सुंदर कविता. खूप दिवसांनी वाचली.

Alka Vibhas said...

@भानस: तुमच्या सगळ्या comments वाचल्या.. thanks a lot.
सगळ्यांसाठी इथे एकाच ठिकाणी... धन्यवाद.

Shubhangi Sawant said...

कवितेने अगदी बालपणात नेउन पोहचवले ग ...

Post a Comment