Dear God,
Any future plans?.... or the same old things?
-alka
p.s. सोबत नुकतंच लिहायला शिकलेल्या छोट्यांची काही पत्रं जोडली आहेत.






















आरशाचं attraction कधीच नव्हतं. लहानपणी आईकडे, घरात असायला हवा म्हणून एक आरसा लाकडी कपाटावर होता. शाळेत जाताना त्याचा उपयोग केल्याचं काही आठ...
एक स्पर्श.. | जीवनाचा... चिमुकला, लुसलुशीत... कुशीत वाढणारा. |
एक स्पर्श.. | सुरकुतल्या, थरथरत्या हातांचा... उबदार क्षमेचा. |
एक स्पर्श.. | कोऱ्या करकरीत कागदावरील छापील अक्षरांचा... उत्सुकता वाढवणारा. |
एक स्पर्श.. | वाकून केलेला, सश्रद्ध, आशादायी... त्या निराकाराच्या मूर्त रूपास. |
एक स्पर्श.. | नाळ तुटण्याआधीपासून ओळखीचा... मायेने ओथंबलेला. |
एक स्पर्श.. | मूल्य असलेल्या कागदांचा. भौतीक अस्तित्वाच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येणारा. |
एक स्पर्श.. | गर्भ रेशमी पदराचा... खानदानी, शालीन... आदराने मान आपसूक झुकवणारा. |
एक स्पर्श.. | कातर संधीप्रकाशातील गूढ सावल्यांचा... काळजाचा ठोका चुकवणाऱ्या भीतीचा. |
एक स्पर्श.. | गर्दीतला... असभ्य, किळसवाणा, अपवित्र. |
एक स्पर्श.. | निखळ, सुंदर मैत्रीचा... स्त्री-पुरुष भेदाभेद निर्थक ठरवणारा. |
एक स्पर्श.. | चमकत्या, झळाळत्या धातुचा... मोहमयी. |
एक स्पर्श.. | लख्ख... मनातला अंध:कार नाहीसा करणाऱ्या ज्ञानाचा. |
एक स्पर्श.. | काळ्याभोर सृजनतेचा. आकाशाला गवसणी घालू पाहताना पायाखालील भक्कम आधाराचा. |
एक स्पर्श.. | चांदण्याचा... दिल्या-घेतल्या वचनांचा, जन्मसोबतीचा. |
एक स्पर्श.. | वरवर कठोर... शिस्त, धाक असल्या शब्दांच्या आडून दिलेल्या अनुभवी सल्ल्यांचा. |
एक स्पर्श.. | हरवलेला... आठवांच्या तुडुंबात बुडून धूसर होत गेलेला. |
एक स्पर्श.. | थंड... निर्वाणीचा. पारलौकिकाच्या दिशेने घेऊन जाणारा. |
मोहन खूप जुना मित्र. थोड्या गप्पा झाल्यावर अचानक उठून म्हणाला, "चल. देवजींना भेटून येऊ. आवडेल त्यांना... म्हणजे ते म्हणाले आहेत तसं."
दुबईतल्या पंचताराकीत हॉटेलच्या त्या खोलीत देव आनंदजी बसले होते. नव्वदीकडे झुकलेलं वय, वयाने आक्रसलेली देहयष्टी, हातांना किंचित कंप... नेमकं काय करावं ? नमस्कार करावा की handshake या संभ्रमात असताना त्यांनीच माझा हात हातात घेऊन बसवलं. तो तसाच ठेऊन ते काहीबाही विचारत होते. मी काय उत्तरं दिली आठवत नाही. कारण flashback मध्ये मला दिसत होता तो ऐन उमेदीतला देव आनंद...
मधुबाला समोर ’देखी सबकी यारी’ म्हणून फुरंगटून बसणारा... साधनाला ’तो किस तरह निभाओगी’ म्हणून विचारणारा... नूतनला काचेच्या ग्लासमध्ये पहात ’इक घर बनाऊंगा, तेरे घर के सामने’ म्हणून बजावून सांगणारा, वहिदाच्या लक्ष न देण्यामुळे हताश होऊन ’दिन ढल जाये पर रात न जाये’ म्हणणारा आणि नंदाच्या ’लिखा है तेरी आखों में किसका अफसाना?" ला उत्तर देताना खट्याळपणे आपली ’रोजाना’ आदत सांगणारा...
वर्तमानात आल्यावर मात्र समोर दिसत होतं ते फक्त एक वयोवृद्ध व्यक्तीमत्व, अतिशय प्रेमळ नजर, सुहृद स्पर्ष, बराचसा एकटेपणा आणि थकलेलं शरीर.
देव आनंद हात हातात धरून बसला, म्हणून तो हात आठ दिवस न धुणे... असलं काही करण्याचं ना त्यांचं वय ना माझं !
पूर्णवेळ त्यांच्यासमोर काहीच बोलू न शकलेली मी, निघताना मात्र खाली वाकले आणि त्यांना एवढंच म्हंटलं, "देव जी, आपका और हमारा रिश्ता तो काफी पुराना है । और... जो खत्म हो इसी जगह... ये ऐसा सिलसिला नहीं ।" त्यावर ते त्यांची typical मान हलवत हलकंसं हसले.